आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. २४ मे २०२४) -
यहोवा यिरे फाऊंडेशन चंद्रपूर च्या संयुक्त विद्यमाने दुर्गापूर वार्ड क्र. ४ येथील राजा भोज हाॅल मध्ये युवकांकरिता रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शिका आणि कमवा या दृष्टिकोनातून रोजगार संधी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार कसा मिळविता येईल याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी यहोवा यिरे फाऊंडेशन च्या अध्यक्षा कु.एलिजा मॅडम, यहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड चंद्रपूर चे CEO रमेशकुमार बोरकुटे, संचालक सौ. अपेक्षा जाॅब, उर्मिला बोबडे. अतुल बनसोड, वैभव चौधरी, यहोवा यिरे फाऊंडेशनच्या व्यवस्थापक सौ. दुर्गा मंडल इत्यादी उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वितेकरिता जितेंद्र बन्सोड आणि त्यांच्या चमूने परिश्रम घेतले. शेकडो बेरोजगार तरुण तरुणींनी या रोजगार संधी मेळाव्याचा लाभ घेतला.
#news #breakingnews #aamchavidarbha #vidarbha #maharashtra
#chandrapur #rajura #Gatheremploymentopportunities #rojgar #berojgar
#jehovahyirefoundation #jehovahyireurbancreditco-operativesocietylimited
#durgapur #rajabhojholl
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.