आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. 24 मे 2024) -
शहरात वाहन चोरींच्या घटनेत वाढ होत असताना राजुरा पोलिसांनी आज दिनांक 21 मे रोजी दुचाकी वाहन चोरट्यास अटक केली व त्याकडून चार वाहने जप्त केले. जवाहर नगर येथील सचिन किसन लांडे यांची गाडी आठवड्याभरापूर्वी चोरीला गेल्यानंतर पोलिसांना तक्रार दिली होती त्यानंतर पोलिसांनी तपासचक्र वेगाने फिरवले व आरोपीला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सचिन संतोष नगराळे (वय 24 वर्ष) सोमनाथपुरा, राजुरा असे आहे.
जवाहर नगर येथील सचिन किसन लांडे वय 29 वर्ष, यांच्या अंगणातून दिनांक 07/05/2024 रोजी रात्रो आंगणामध्ये बजाज कंपनीची अंवजेर मो. सा क्र.MH 34 AY 5450 व एक बजाज कंपनची 150 पल्सर मो.सा क MH 34 BE 0115 दोन्ही वाहने चोरीला गेली होती. त्यानंतर त्यांनी मोटार सायकलचे इतरत्र शोध घेतला असता मिळुन आले नाही तेव्हा दिनांक 13 मे रोजी पोलीस स्टेशन राजुरा येथे तक्रार दिली. गुन्हे शोध पथकातील पांडुरंग डी. हाके, सुनिल गौरकर, किशोर तुमराम, महेश बोलगोडवर, रामराव, तिरूपती, योगेश पिदुरकर यांनी चोरट्याचा शोध घेतला व आरोपीस ताब्यात घेतले. आरोपी सचिन संतोष नगराळे याला अटक करण्यात आली. या गुन्हयातील दोन तसेच गडचिरोली जिल्हयातील पोलीस स्टेशन देसाईगंज वडसा येथे दाखल असलेल्या एक गुन्हयातील मोटार सायकल तसेच एक लावारिश स्थितीत असे एकुण चार मोटार सायकल आरोपीकडून जप्त केले.
आरोपी सचिन नगराळे यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन अप क 344/2024 कलम 379 भादवी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्य बजाज एवेंजर काळया रंगाची MH.34 AY 5450, बजाज पल्सर काळया रंगाची क. MH 34 BE 0115 एक काळया रंगाची हिरो स्पेल्डर प्लस MH 34 CF 9659 जप्त करण्यात आले. आरोपीकडून एकुण 1,90,000 रू चा माल जप्त केला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे यांचे मार्गदर्शनाखाली राजुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, पांडुरंग डी. हाके, सुनील गौरकार, किशोर तुमराम, महेश बोलगोडवार, रामराव बिंगेवाड, तिरूपती जाधव, योगेश पिदुरकर, रवींद्र तुराणकर यांनी केली आहे.
#news #breakingnews #aamchavidarbha #vidarbha #maharashtra
#chandrapur #rajura #police #policestationrajura #superintendentofpolice
#twowheelerthiefarrested #Motorcycleconfiscated #theaccused
#Filedacase #confiscation
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.