- आता कोरपना वासियांना २४ तास गॅस होणार उपलब्ध
कोरपना -
कोरपना वासियांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून केंद्र सरकारच्या नव्या धोरणा नुसार मौजा कोरपना येथे निवृत्तीजी एच पी गॅस या गॅस एजन्सी चे अधिकृत सेवा केंद्र /विक्री केंद्र हे टेंभूर्डे सी.एस.सी चे संचालक तथा तालुका अध्यक्ष दीपक टेभूर्डे यांनी सुरू केले आहे. गॅस एजंसीचा शुभारंभ निवृतीजी एच पी गॅस चे वितरक डॉ. अंकुश गोतावळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. आता कोरपना वासियांना २४ तास गॅस उपलब्ध होणार आहे. या केंद्रावर नेहमी गॅस सिलेंडर उपलब्ध असणार आहे. रात्री अपरात्री सुद्धा आपल्याला बुकिंग करून गॅस सिलेंडर मिळणार आहे सदर चे केंद्र सुरू करण्याकरिता सी.एस.सी सेंटर संचालक दीपक टेम्भूर्डे यांनी खूप प्रयत्न केले असून त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश चंद्रपूर सीएससी सोसायटी कडून मिळाले आहे. उदघाटनप्रसंगी चंद्रपूर जिल्हा सीएससी सोसायटी चे अध्यक्ष विनोद खंडाळे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी कोरपना तालुक्यातील सीएससी तालुका अध्यक्ष दीपक टेम्भूर्डे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नांदाफाटा चे सीएससी चे संचालक गणेश पिंपळकर तसेच रणजित सूर्यवंशी हे उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.