Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कोविड लसीकरणा बाबत गैरसमज दुर करण्यासाठी जनजागृती आवश्यक - संजय गजपुरे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बोंड प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोविड लसीकरणाची सोय आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स नागभीड - कोविडवर लसीकरण हाच उपाय असल्याचे लक्षात येत असल्...

  • बोंड प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोविड लसीकरणाची सोय
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नागभीड -
कोविडवर लसीकरण हाच उपाय असल्याचे लक्षात येत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी आता लसीकरण करून घ्यायला सुरुवात केली आहे. नागभीड तालुक्यातील प्रत्येकच गावात जि.प. व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तसेच आरोग्य व महसुल विभागाच्या सहकार्याने कोरोना संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. यामुळे कोविड लसीकरणा बाबतीतील अनेक गैरसमज आता दुर होत असुन नागरिक स्वयंस्फूर्तीने लसीकरणाला येत असल्याची प्रतिक्रिया जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी व्यक्त केली आहे. यात आशावर्कर, आंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, ग्रा.पं. पदाधिकारी, सदस्य व कर्मचारी यांचा महत्वपूर्ण वाटा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नागभीड तालुक्यातील बाळापुर (बुज.) प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत बोंड या उपकेंद्राच्या ठिकाणी लसीकरणाची सुरुवात पारडी-मिंडाळा-बाळापुर क्षेत्राचे जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. बोंड येथे जि.प.प्राथमिक शाळेत तालुका आरोग्य अधिकारी डॅा.विनोद मडावी यांच्या नियोजनातुन व बाळापुर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणाची सोय करण्यात आली होती .

याप्रसंगी प्रथम लसीकरण करणाऱ्या नागरिकांचे उपस्थितांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तालुक्यातील ४५ वर्षावरील सर्वच नागरिकांनी मनात कुठलीही भिती न बाळगता कोविड लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी याप्रसंगी केले. जि.प.क्षेत्रात संजय गजपुरे यांच्या वतीने प्रत्येकच गावात मास्क व सँनिटायझेशन चे तसेच जनजागृती पत्रकांचे वाटप सुरु आहे. आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार कोविशील्ड लसीचा दुसरा डोज आता ८४ दिवसानंतर दिल्या जाणार आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता स्वत: च्या व कुटुंबाच्या सुरक्षित आरोग्यासाठी आरोग्य प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करण्याची विनंती केली.

लसीकरण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोंड येथील सरपंच सौ. निशाताई सिडाम, उपसरपंच जगदीश पाटील राऊत, भाजपाचे पं.स. प्रमुख विनोद हजारे, ग्रा.पं. सदस्य अशोक कोहपरे व जैतराम सिडाम, ग्रामसेवक नंदनवार, उपकेंद्राचे आरोग्य कर्मचारी अजय शेटे, शेंडे, थुलकर व दुधपचारे सिस्टर, संजय मंगरे, सविता पिलारे, पत्रकार भोजराज नवघडे यांची उपस्थिती होती. बोंड ग्रामपंचायत ने लसीकरणासाठी जनजागरण व पिण्याच्या पाणी सह सर्वपरीने मदत केली होती. भाजपाच्या वतीने यावेळी मास्क चे वितरण करण्यात आले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top