Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अखेर ग्रा.पं. उपसरपंच प्रफुल तुम्मे यांच्या प्रयत्नांना यश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या कडून सावली तालुक्यासाठी 5 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर माजी आमदार अतुल देशकर यांचा पुढाकार पाथरी येथे कोविड से...

  • केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या कडून सावली तालुक्यासाठी 5 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर
  • माजी आमदार अतुल देशकर यांचा पुढाकार
  • पाथरी येथे कोविड सेंटर मध्ये अतिशय उत्तम कार्य सुरु आहे - अतुल भाऊ देशकर
  • गेले 2 दिवस सतत ऑक्सिजन कॉन्संट्रेटर साठी प्रफुल तुम्मे यांनी उपल्ब्ध करण्याचे प्रयत्न केले
  • त्या प्रयत्नाची दखल घेते अतुल भाऊ देशकर यांनी दिली मदतीची हाक

आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
सावली -
सावली तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत शासन व प्रशासनाची यंत्रणा कमी पडत असतांना ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांनी भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या कडे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर करून देण्याची मागणी केली. 

आज ब्रह्मपुरी येथील विश्रामगृहात ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी सदर 5 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर सावली पं. स चे माजी उपसभापती तुकाराम पा. ठिकरे, पाथरीचे उपसरपंच प्रफुल तुम्मे, शरद सोनवाने यांना सुपूर्द केले.

सावली तालुक्यातील जनतेसाठी ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी आमदार अतुल देशकर यांचे भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल, माजी जि.प सभापती संतोष तंगडपल्लीवार, महामंत्री सतीश बोंम्मावर,तुकाराम पा.ठिकरे,शरद सोनवाने तथा भाजयुमो चे जिल्हा उपाध्यक्ष विशाल RK यांनी आभार मानले आहेत. 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top