Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रेती घाटावर जाऊन वसुली करू पाहणाऱ्या तोतया उत्खनन अधिकाऱ्यास अटक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
प्रिया झामरेची न्यायालयीन कोठडीत रवानगी आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर - दि. 19 जून 2020 ला आपल्या वाहनात तिघांना घेऊन वढा येथे रेत...

  • प्रिया झामरेची न्यायालयीन कोठडीत रवानगी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
दि. 19 जून 2020 ला आपल्या वाहनात तिघांना घेऊन वढा येथे रेती घाटावर जाऊन आम्ही उत्खनन विभागातून आलो आहे असे सांगत व अवैध रेतीचा एक ट्रॅक्टर पकडून हजारो रुपये वसुल करून पोबारा करणाऱ्या  प्रिया परमेश्वर झामरे (40) रा. बल्लारशाह ला आज अटक करण्यात अली. 

यांनी आपल्या वाहनात तिघांना घेऊन वढा येथे रेती घाटावर जाऊन आम्ही उत्खनन विभागातून आलो आहे असे सांगितले व अवैध रेतीचा एक ट्रॅक्टर पकडून हजारो रुपये वसुल करून पोबारा केला होता. याची चर्चा घुग्घुस परिसरात पसरताच हि माहिती भौगोलिक माहिती विभागाच्या अल्का खेडकर यांना मिळाली त्यांनी शहानिशा करून घुग्घुस पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. तक्रारी वरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच मुख्य सूत्रधार प्रिया झामरे ही फरार होऊन तिने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता परंतु तो अर्ज फेटाळण्यात आला अर्ज फेटाळताच गुरवारला घुग्गुस पोलीस स्टेशनच्या सहा. पोलीस निरीक्षक मेघा गोखरे यांनी आपल्या पथकासह बल्लारशाह गाठून आरोपी प्रिया झामरे यांना अटक केली व शुक्रवारला चंद्रपूर न्यायालयात हजार केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top