Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्यातर्फे भिसी येथील ऑटो चालकांना किराणा किट चे वितरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
लॉकडाऊन च्या संकट काळात ऑटो चालकांना दिला मदतीचा हात मनोज सोगलकर - आमचा विदर्भ विशेष प्रतिनिधी चिमूर - दि. १३ मे रोजी चिमूर विधानसभा क्षेत्र...

  • लॉकडाऊन च्या संकट काळात ऑटो चालकांना दिला मदतीचा हात

मनोज सोगलकर - आमचा विदर्भ विशेष प्रतिनिधी
चिमूर -
दि. १३ मे रोजी चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री. किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांच्या तर्फे लॉकडाऊन च्या गंभीर परिस्थितीमध्ये ऑटोचालकांचे रोजगार बंद असल्याने त्यांच्या समोर संकट उभे असतांना त्यांना मदतीचा हात देत 17 ऑटोचालकांना किराणा किटचे वितरण करण्यात आले.

गत वर्षभरापासून कोरोना महामारी सारखे संकट समस्त जगासमोर उभे ठाकले आहे. या मोठ्या संकटाशी मनुष्य रोजच संघर्ष करतोय या महामारिने राजा आणि रंक, सर्वांनाच एका रांगेत बसविले आहे. या महामारीच्या संकटामुळे पुन्हा एकदा लाॅकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली.आणि परत पुन्हा लॉकडाऊन सुरू आहे. 

रोज-मजुरी करून आपलं संसाराचा गाढा ओढणारी गोर-गरीब जनता या संकटापुढे हतबल झाली आहे. लॉकडाऊन असल्याने रस्ते वाहतुक सुद्धा अल्पप्रमाणात आहे त्यात फक्त अत्यावश्यक सुविधा सुरू असून, खाजगी वाहतुकीची साधने सुद्धा सरकारच्या निर्देशानुसार बंद आहेत. त्यातच ऑटो वाहतूक बंद असल्याने ऑटोचालकांचा सुद्धा रोजगार बंद पडला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. चिमूर तालुक्यातील भिसी परिसरातील ग्रामीण भागात ऑटोचालक ऑटो चालवून आपली उपजीविका करत असतात. लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली असून ते अत्यंत अडचणीत आहेत अशी माहिती मिळाली, शासन मदतीस धावून येण्यास विलंब होत असताना त्यांची तात्काळ दखल घेत आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्यातर्फे लगेच भिसी येथील गरजू ऑटोचालकांना किराणा किट चे वितरण करण्यात आले.

यावेळी, भाजपा युवा नेते मा. प्रदीप कामडी सदस्य पं. स चिमूर, विनोद खवसे शहराध्यक्ष भाजयुमो भिसी, राजू बानकर शक्ती केंद्र प्रमुख भाजपा भिसी आदी पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top