Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भूईमुगाचे बियाणे निघाले बोगस
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तेलबियावर्गीय पिकांना चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी भूईमुगाची लागवड केली. या पिकाकडून आशा वाढल्या असताना भूईमुगाचे बियाणे बोगस निघाल्य...

  • तेलबियावर्गीय पिकांना चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी भूईमुगाची लागवड केली. या पिकाकडून आशा वाढल्या असताना भूईमुगाचे बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे....
यवतमाळ - पुसद तालुक्यातील पिंपळगाव येथील महेश चौधरी व निलेश चौधरी या शेतकऱ्यांच्या शेतातील भूईमुगाच्या पिकाला शेंगाच लागल्या नाही  त्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ (नेर) -
भूईमुगाचे बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. कृषी विभागाने त्वरित नुकसानीचे सर्वेक्षण करून दोषी बियाणे कंपन्यांवर कारवाई  करावी व शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी. नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या लागवडीचा खर्चही भरून निघाला नाही. यातच करोनाचे संकट वाढल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. तेलवर्गीय पिकांना अधिक भाव मिळणार म्हणून शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरण्या केल्या. पिकही बहरून आले. पण, भुईमुंग पीकाला शेंगाच लागल्या नाही. सततच्या नापीकी मुळे शेतकरी हतबल झाला आहे. सरकार ने शेतकर्यांकडे लक्ष द्यावे. कृषी विभागाने त्वरित नुकसानीचे सर्वेक्षण करून दोषी बियाणे कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top