Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विहिरगाव वनपरीक्षेत्रातील मजुरांना तातडीने बोनस देण्यात यावे - इर्शाद शेख
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - वनविभागाकडून राबविण्यात असलेले तेंदूपत्ता संकलन सन 2019 ते 2020 या हंगामातील रखडलेले ते...


अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
वनविभागाकडून राबविण्यात असलेले तेंदूपत्ता संकलन सन 2019 ते 2020 या हंगामातील रखडलेले तेंदूपत्ता बोनस राजुरा वनविभागातील विहिरगाव परिक्षेत्रात मजुरांना आजपर्यंत  वितरित करण्यात आलेले नाही.

करिता सध्या मजुरांना कोणतेही मजुरीचे काम नसून कोरोना काळात त्यांचे जीवन हलाखीचे होत आहे. मजुरांवर उपासमारीची वेळ आलेली असून यथाशिग्र थकीत तेंदूपत्ता बोनस मिळाल्यास त्यांना सोयीचे होईल करीता तात्काळ दखल घेऊन गोरगरीब मजुरांना तेंदुपत्ता बोनस तातडीने देण्यात यावा अशी मागणी विहिरगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच इर्शाद शेख यांनी आमदार सुभाष धोटे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

सध्या परिस्थितीत सर्वत्र कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढत असून शासनाने लाकडाऊन लावलेला आहे. अशा स्थितीत अनेकांच्या घरातील आर्थिक बजेट कोलमडून पडले आहेत. सदर परिस्थिती लक्षात घेऊन या वनपरीक्षेत्रातील मजुरांना किमान त्यांच्या हक्काचे बोनस तातडीने उपलब्ध करून दिल्यास तेवढेच त्यांना आधार होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top