Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अन् "त्यांनी" चिमण्यांसाठी चक्क घरीच बांधले घरटे !
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
त्यांच्या पक्षीप्रेमाने घरीच झाला चिवचिवाट सामाजिक बांधिलकीची जाण पक्षांसाठी लाखमोलाची अनंता गोखरे - आमचा विदर्भ राजुरा - समाजात काही असेही ...

  • त्यांच्या पक्षीप्रेमाने घरीच झाला चिवचिवाट
  • सामाजिक बांधिलकीची जाण पक्षांसाठी लाखमोलाची

अनंता गोखरे - आमचा विदर्भ
राजुरा -
समाजात काही असेही सेवाभावी माणसे असतात, ते केवळ इतरांसाठी जगण्यातच धन्यता मानतात.समाजात जीवन जगत असताना आपणही, कुणासाठी चांगले करावे यासाठी त्यांची नेहमीच धडपड असते. सध्या एप्रिल महिन्याच्या अखेरीस सूर्य चांगलाच तापल्याने माणसांसह पशू, पक्षांनाही त्याची चांगलीच झळ सोसावी लागत आहे. मात्र राजुरा तालुक्यातील भेदोडा येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश पारखी यांनी सामाजिक भावनेतून चिमण्यांसाठी चक्क घरीच "घरटे" बांधून त्यांना आश्रय दिला आहे. 

सध्या कोरोनासारख्या जागतिक महामारीने सर्वच संकटात सापडले आहेत. कोरोनामुळे यावर्षी जीव वाचविणे मुश्किल झाले आहे. अशातच एप्रिल महिन्याच्या अखेरीस सूर्याच्या प्रखर झळा माणसांसह पशू,पक्षांनाही अत्यवस्थ करणाऱ्या आहे. मात्र सामाजिक दायित्व जोपासत आपणही पक्षांसाठी काहीतरी चांगले करावे, या उद्दात हेतूने राजुरा तालुक्यातील भेदोडा येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश पारखी यांनी चिमण्यांसाठी घरीच घरटे बांधले. यासाठी त्यांचा मुलगा प्रणय पारखी यांचेही या कामासाठी महत्वाचे सहकार्य लाभले. चिमण्यांसाठी स्वखर्चातून घरटे विकत आणून ते घराच्या अंगणातील शेडमध्ये छताला बांधून त्यांना हक्काचे घर उपलब्ध करून देऊन चिमण्यांना राहण्याची व्यवस्था करून दिली. सोबतच चिमण्यांना दाना पाण्याची सोय करून दिली.  त्यामुळे अंगणातील चिमण्यांचा रमणारा चिवचिवाट मनाला आनंद देणारा असल्याची प्रतिक्रिया उमेश पारखी यांनी दिली. आज एकमेकांसाठी कुणाकडेच वेळ नाही. मात्र सामाजिक सेवेसाठी सतत कार्यरत असणारी माणसे इतरांसाठी काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न नेहमीच करीत असताना दिसतात. सामाजिक भावनेतून पक्षीप्रेमापोटी त्यांनी घरीच चिमण्यांसाठी शानदार घरटे बांधल्याने विविध सामाजिक संघटनांनी त्यांचे कौतुक केले असून हा सामाजिक बांधिलकी जोपासणारा उपक्रम अनेकांना आदर्श ठरणारा आहे.

पक्षांची संख्या दिवसागणिक कमी होत चालली आहे. उन्हामुळे सर्वच प्राणिमात्रांचा जीव कासावीस झाला आहे. आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेतून पक्षांसाठी जे चांगले करता येईल,या उदात्त हेतूने घराच्या अंगणातील शेडमध्ये चिमण्यांसाठी घरटे बांधून  त्यांच्या राहण्याची सोय करून दिली. त्यामुळे अंगणातील चिमण्यांचा चिवचिवाट नक्कीच मनाला आनंद देणारा आहे.
उमेश पारखी
सामाजिक कार्यकर्ते, भेदोडा

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top