Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कवठीत लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कुमारी पौर्णिमा फाले - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी सावली - सावली तालुक्यात मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव दिसून येत असुन कवठी उपकेंद्र...

कुमारी पौर्णिमा फाले - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
सावली -
सावली तालुक्यात मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव दिसून येत असुन कवठी उपकेंद्रतर्गत करोना बाधित रुग्ण आढळले आहेत अशावेळी आरोग्य विभागाने येथील उपकेंद्रात तत्काळ लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सावली तालुक्यातील खेडी, सावली, जिबगाव, हरांबा, बोथली या गावांत लसीकरण केंद्र दिले आहेत, परंतु कवठी गाव तालुक्यापासुन ७ किमी अंतरावर असुन जाण्या-येण्यासाठी  वयोवृद्धाना अडचन निर्माण होत आहे. कवठी गावात आरोग्य विभागाचे वर्धिनी उपकेंद्र आहेत. गावात सर्दी, खोकला, ताप या सारख्या आजारांचे रूग्न असुन कोरोना सदृश्य स्थिती आहे. उप केंद्रा अंतर्गत करोना बाधित आहेत. त्यापैकी काही बाधित कोविड सेंटरला राहिले इतर घरीच क्वारंनटाइन आहेत असे असतांना आरोग्य विभागात कार्यरत फक्त दोन परिचारिका दिल्या आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असुन गावातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केल्या जात असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान सरपंच कांता बोरकुटे आणि ग्रामविकास अधिकारी सांगोडकर यांनी गावातच लसीकरणाची सोय करू असे आश्वासन दिले आहेत. त्यातच नागरिकांनीही गावातच लसीकरण केंद्र उभारण्याची मागणी केली आहे. 


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top