Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ठेकेदार व रेती तस्करांना तस्कराना महसुल अधिकाऱ्यांचे आशीर्वाद?
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स कोरपना - कोरपना तालुक्याच्या सिमेवरुन वाहणाऱ्या पैनगंगा नदी वरील २ घाटाचे लिलाव झाले मात्र याबाबत अनेक तक्रार...

आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
कोरपना -
कोरपना तालुक्याच्या सिमेवरुन वाहणाऱ्या पैनगंगा नदी वरील २ घाटाचे लिलाव झाले मात्र याबाबत अनेक तक्रारी असुन महसुल विभाग गप्प असल्याने नेमके पाणी कुठ मुरतय हे नागरिकांच्या समजण्यापलीकडचे झाले आहे. ब्रेक द चेन व कोरोनाचे थैमान सुरु असतांना जो-तो संधीचे सोने करण्यात मग्न असल्याने प्रशासनाचा वचक नसल्याचा भास निर्माण होत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. मुख्यालयी न राहणारे अधिकारी २० कि.मी. अंतरावरून उटांवरून शेळ्या हाकण्याचे काम करीत असल्या ने सामान्य नागरीकाचे रस्त्यावरील वाहन जप्त करून कार्यवाहीचा ओहापोह करतात. मात्र ठेकेदार व काही वाहन मालक यांच्या सगंणमतातुन मोठे कंत्राटदार दालमिया, नांरडा, कोरपना, सोनुर्ली, धनकदेवी भागात रस्ते बंधारे पुलाच्या कामावर टिपी व रेती वाहतुक परवाने नसतांना सर्रास चोरीने रेती वाहतुक करून मोठी मोठी कामे करण्यात येत असतांना याची साधी दखलही महसुल विभागाने का घेतली नाही. यामुळे शासनाच्या महसुला ला चुना लावल्या जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यापुर्वी जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी चंद्रपूर, भद्रावती, घुगुस, बल्लारपूर या क्षेत्रात थेट घाटावर जाऊन जेसिबी, ट्रक, ट्रक्टर वाहन जप्त केली होती. त्यांनी कार्यवाही करत शासनाच्या तिजोरीत महसुल वाढविला मात्र कोरपना तालुक्यातील झोटींग वनोजा घाटावरुन गेल्या अनेक महिण्या पासून सर्रास ६ ते ७ ट्रक्टरने नदी तुन रेतीचा उपसा करून तस्करी होत असल्याचे अनेक  तक्रारी व ओरड होत असताना देखील महसुल अधिकारी कानडोळा करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. भरारी पथक कुचकामी ठरले असून खुलेआम रेती तस्कर चोरीने वाहतुक करीत महसूल विभागातील अधिकाऱ्यां समवेत आमची सेटींग आहे असे म्हणत सर्रास रेती तस्करी करीत आहे. महसुल अधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी, भरारी पथक दिखावा ठरत असताना रेती चोरी वर आळा घालण्याचा प्रयत्न होणार कसा? असा सवाल नागरीक उपस्थित करीत आहे. हे कुख्यात रेती तस्कर कोन हे कार्यवाही करून जनतेला कळणार का? असा हि प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top