Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: निष्काळजीपणामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शाह हाॅस्पिटलमध्ये तोडफोड ; नातेवाईक संतप्त रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी यवतमाळ - येथील कोविड रुग्णालय असलेल्या शाह हाॅस्पिटलमध्ये उप...

  • शाह हाॅस्पिटलमध्ये तोडफोड ; नातेवाईक संतप्त

रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ -
येथील कोविड रुग्णालय असलेल्या शाह हाॅस्पिटलमध्ये उपचारात चालढकल केल्यामुळे बाधित महिला रुग्ण दगावली. असा आरोप करीत संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. ही गंभीर घटना मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. घाटंजी तालुक्यातील शिवणी येथील एका महिला  कोरोना बाधित रुग्णाला शाह हाॅस्पिटलमध्ये चिंताजनक स्थितीत दाखल करण्यात आले होते. दरम्यान नर्स स्टाफने रुग्णाचे ऑक्सिजन मास्क काढल्याने व उपचार सुरू करण्यास चालढकल केल्याने रुग्ण दगावला. असा आरोप करीत मयत रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ सुरू केला. दरम्यान रुग्णालयाच्या काचांसह संगणकाची तोडफोड सुरू केली. यामध्ये नोंदणी कक्ष. ऑक्सिजन सिलेंडर कक्षासह पॅथॉलॉजी आणि मेडिकल स्टोअर मध्ये देखील या नातेवाईकांनी तोडफोड करून रोष व्यक्त केला. या संपूर्ण गोंधळामुळे रुग्णालयात कर्मचारी व रूग्णाच्या नातेवाईकांमध्ये पळापळ सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलीस घटनास्थळी धाव घेत तोडफोड करणाऱ्या दोन संतप्त युवकांना ताब्यात घेतले. तसेच त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी डॉक्टर शाह यांनी अशाच प्रकारची तक्रार दिली नाही परंतु या घटनेमुळे जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top