Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: उपजिल्‍हा रूग्‍णालय मुल येथे 50 ऑक्‍सीजन बेडसला मंजुरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांनी दोनच दिवसात मागणी पुर्ण मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्...

  • आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांनी दोनच दिवसात मागणी पुर्ण
मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मुल येथे 50 ऑक्‍सीजन बेडसला मंजुरी देण्‍यात आली आहे. जिल्‍हाधिकारी चंद्रपूर यांनी दिनांक २९ एप्रील 2021 रोजीच्‍या आदेशान्‍वये मुल येथे 50 ऑक्‍सीजन बेडसला प्रशासकीय मान्‍यता दिली आहे.

दिनांक 27 एप्रिल रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय मुल येथे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली होती. त्‍यावेळी मुल शहर व तालुक्‍यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्‍या सोयीच्‍या द़ष्‍टीने 50 ऑक्‍सीजन बेडसला प्रशासकीय मान्‍यता देण्‍याची मागणी केली होती. त्‍याद़ष्‍टीने स्‍थानिक यंत्रणांना जिल्‍हाधिका-यांकडे प्रस्‍ताव पाठविण्‍याच्‍या सुचना सुध्‍दा त्‍यांनी दिल्‍या होत्‍या. जिल्‍हाधिका-यांशी चर्चा करून आ. मुनगंटीवार यांनी दोनच दिवसात ही मागणी पुर्णत्‍वास आणली आहे.

मुल येथील उपजिल्‍हा रूग्‍णालयात 50 ऑक्‍सीजन बेडससाठी 50 लक्ष रू खर्चाला प्रशासकीय मान्‍यता देण्‍यात आली आहे. येत्‍या 4 ते 5 दिवसात हे ऑक्‍सीजन बेडस उपजिल्‍हा रूग्‍णालयातील रूग्‍णांच्‍या सेवेत रूजु होतील. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top