- सावलीत 6 कोटीचे आक्सिजनयुक्त दवाखाना उभारणार
- कोविड केअर सेंटरला दिली भेट
कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असल्याने उपाययोजनाबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सावली तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. एकूण पॉजिटिव्ह 950 असून आजपर्यंत 10 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची व 13 हजार लसीकरण झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून 100 बेडचे ऑक्सिजनयुक्त दवाखाना 6 कोटी किंमतीचे बांधकाम अंदाजपत्रक तयार करण्याचे बांधकाम विभागास निर्देश दिले. त्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारणार, अंबुलन्स व स्वर्गरथ करीता नगरपंचायतला 25 लाखाचा निधी देण्याचे निर्देश संबंधितांना दिले. सावली शहरात तात्काळ निर्जंतुकीकरण करण्याचे मुख्याधिकारी यांना आदेश दिले. पाणीपुरवठा व इतर विषयांवर चर्चा झाली. ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली व नवीन दवाखाना इमारतीसाठी जागेची पाहणी यावेळी केली. कोविड केअर सेंटरला भेट देऊन सोयी सुविधाबाबत चर्चा केली व 20 जम्बो आक्सिजन सिलेंडर पुरवठा करण्याचे आदेश दिले. यावेळी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, तहसीलदार परीक्षित पाटील, बीडीओ निखिल गावडे, मुख्याधिकारी वजाडे, आरोग्य विभाग, वनविभाग, बांधकाम विभाग, कृषी विभागाचे अधिकारी, काँग्रेस शहर युवा अध्यक्ष नितीन दुवावार, संदीप पुण्यपवार, छत्रपती गेडाम, मोतीलाल दुधे, चंद्रकांत गेडाम उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.