Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: भूईमुगाचे बियाणे निघाले बोगस
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शेतकऱ्यांना बसला आर्थिक फटका रक्षित पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी यवतमाळ - मागील काही महिन्यांत तेलबियावर्गीय पिकांना चांगले दर मिळत असल्यान...

  • शेतकऱ्यांना बसला आर्थिक फटका
रक्षित पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ -
मागील काही महिन्यांत तेलबियावर्गीय पिकांना चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी भूईमुगाची लागवड केली. या पिकाकडून आशा वाढल्या असताना भूईमुगाचे बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. कृषी विभागाने त्वरित नुकसानीचे सर्वेक्षण करून दोषी बियाणे कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे यांनी केली आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या लागवडीचा खर्चही भरून निघाला नाही. यातच करोनाचे संकट वाढल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. तेलवर्गीय पिकांना अधिक भाग मिळणार म्हणून शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरण्या केल्या. पिकही बहरून आले. पण, यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील भूईमुगाच्या पिकाला शेंगाच लागल्या नाही. यासाठी कृषी विद्यापीठांची निष्क्रियता मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचा आरोपही मोघे यांनी केला आहे. हरितक्रांतीचे प्रणेते राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी राज्यात मोठ्या संख्येने कृषी विद्यापीठांची स्थापना केली. या विद्यापीठांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी सतत संशोधन होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. आजही शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारल्या जात असल्याचा आरोपही मोघे यांनी केला आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top