Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरोना रुग्णांसाठी राजुरा येथे १०० आॉक्सिजन बेड आणि आवश्यक सुविधा सुरू करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार सुभाष धोटे यांच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना सुचना file image अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - राजुरा येथे नुकतेच आ...

  • आमदार सुभाष धोटे यांच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना सुचना
file image

अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा येथे नुकतेच आमदार सुभाष धोटे यांच्या अथक परिश्रमाने पुर्णत्वास आलेल्या १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण झाले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होण्यास प्रारंभ झाला. मात्र सध्या कोरोना व्हायरसचा फैलाव मोठय़ा प्रमाणात होत असून कोरोना पॉझीटिव्ह रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. यामुळे राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांना वेळीच रुग्णवाहिका, ऑक्सिजन बेड, औषधे आणि आवश्यक सेवा राजुरा येथेच उपलब्ध होण्याची नितांत आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे १०० आॉक्सीजन बेड व आवश्यक सुविधा, डॉक्टर तातडीने सुरू करून देण्याबाबतच्या सुचना आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हा चिकिस्तक निवृत्ती राठोड यांना दिलेल्या आहेत. 

संपूर्ण देश, महाराष्ट्र, चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील अपुऱ्या सुविधांअभावी अनेक कोरोना रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध कोविड सेंटर अधिक कार्यक्षम करून स्थानिक रुग्णांना राजुरा येथेच सर्व सुविधा उपलब्ध करून त्यांचेवर कोरोना संबंधित उपचार प्रभावीपणे करण्यात यावेत यासाठी येथे सर्व आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सुचना राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिलेल्या आहेत. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top