Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरोना रुग्णांच्या सोयी सुविधांसाठी हंसराज अहीर यांनी दिला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे वाढते संक्रमण हि चिंतेची बाब बनली असून कोरोनाच्या रुग्णांना बेड, ऑक...

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे वाढते संक्रमण हि चिंतेची बाब बनली असून कोरोनाच्या रुग्णांना बेड, ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर करिता वणवण करावी लागत आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवस्था कोलमडली असतांना रुग्णांचे तसेच त्यांच्या परिवाराचे हाल होत आहे. कोरोनाची दुसरी लाट हि गंभीर स्वरूपाची असून सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण पसरत आहे असे सांगतांना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवस्था अधिक प्रबळ करून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आवश्यक ती योग्य सुविधा करण्याची मागणी घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोरोना काळ नियमांचे पूर्णतः पालन करीत स्वतः धरणे दिले. 

सदर धरणे आंदोलनाच्या माध्यमातून हंसराज अहीर पुढील मागण्या जिल्हा प्रशासनासमोर मांडणार आहेत -

  • चंद्रपूर शासकीय महाविद्यालय महिला रुग्णालयात सेंट्रल ऑक्सिजन सिस्टम, व्हेंटिलेटर, आयसीयू च्या व्यवस्थेसह ४०० बेड उपलब्ध असतांना ते त्वरित सुरु करावे.
  • डॉक्टर्सची कमी सेवाभावी आयएमए शी चर्चा करून फिजिशियन, MBBS डॉक्टर्सची गरज आहे ती विनंतीवर मागणी करून सहकार्य घ्यावे.जिल्ह्यातील प्रमुख शहरातील चंद्रपूर महानगरासह खाजगी रुग्णालये बालरोग रुग्णालयासह अधिग्रहित करावे.
  • वेकोलिचे माजरी, घुग्घुस, बल्लारपूर चे ३ हॉस्पिटल कोविड १९ साठी त्वरित अधिग्रहित करावे.
  • लालपेठ हॉस्पिटल वेकोलिचे सामान्य रुग्णालयातील एक विभाग शिफ्ट करून त्याजागी कोविड १९ चे बेड वाढवा.
  • रेमडेसिवीर इंजेक्शन ची कमतरता भासणार नाही अधिक मागणी करून उपलब्ध करून घ्यावे.
  • जेष्ठ डॉक्टरांसह  BAMS / BHMS व अन्य प्रॅक्टिशनर डॉक्टर्सना कोविड १९च्या सेवेकरिता मदत घ्यावी.
  • होम आयसोलेट परिवार व रुग्णांसाठी खोल्यांची अडचण पाहता मंगल कार्यालये, वसतिगृह, शाळा अन्य अधिग्रहण करून गरीब कुटुंबाना व्यवस्था करून घ्यावी. महानगर पालिकेने यात पुढाकार घ्यावा.

प्रबळ आरोग्य सेवा हे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार असतांना जिल्हा प्रशासनाने सामान्य नागरिकांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या व वैद्यकीय सेवा सुदृढ करावी. प्रत्येक रुग्णाला योग्य ती वैद्यकीय सेवा मिळालीच पाहिजे जेणेकरून जिल्ह्यातील भीतीचे वातावरण कमी होत रुग्णसंख्या आटोक्यात येऊन जिल्ह्याची कोरोनमुक्ती कडे वाटचाल होईल असे यावेळी अहीर यांनी सांगितले.  येत्या काही दिवसात  जनहितार्थ केलेल्या मागण्या पूर्ण न झाल्यास मोठे आंदोलन उभारण्याचे संकेत सुद्धा यावेळी हंसराज अहीर यांनी दिले. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top