Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भद्रावती शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी भद्रावती - भद्रावती शहरात आणि तालुक्यात कोविड-१९ रुग्णांची संख्या मोठ्या ...

  • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी

आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी
भद्रावती -
भद्रावती शहरात आणि तालुक्यात कोविड-१९ रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी चंद्रपूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

दि.१६ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख यांच्या नेतृत्वात तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर, शहर अध्यक्ष रोहन खुटेमाटे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने येथील तहसीलदार महेश शितोळे यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठवले. 

निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात कोविड - १९ ची दुसरी लाट आल्यामुळे बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच भद्रावती शहर व तालुक्यामध्ये अशा बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शहरातील रुग्णालयात आणि कोविड सेंटरमध्ये गैरसोय होत आहे. संचारबंदी असतानासुद्धा नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरत आहेत. शासनाकडून वारंवार सूचना देऊनही रस्त्यावर विनाकारण फिरणे, गर्दी करणे आदी प्रकार थांबले नाहीत. त्याकरीता भद्रावती शहरात कडक संचारबंदी लावण्यात यावी व विनाकारण फिरणाऱ्यां नागरिकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनाची खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, ठाणेदार, मुख्याधिकारी आणि संवर्ग विकास अधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top