Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपूरच्या प्रतिभा वाघमारे ने पटकाविला बेस्ट मेकअप आर्टिस्ट गोल्डन विंग्स अवॉर्ड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
प्रसिद्ध सिने अभिनेत्री तनुश्री दत्ता च्या हस्ते पुरस्कार प्रदान शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - चंद्रपूर येथील भिवापूर भिवापूर...

  • प्रसिद्ध सिने अभिनेत्री तनुश्री दत्ता च्या हस्ते पुरस्कार प्रदान
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर येथील भिवापूर भिवापूर वॉर्डातील शांती ब्युटी पार्लर व कॅस्मेटालॉजिस्ट मेकअप स्टुडिओ ची संचालिका प्रतिभा वाघमारे यांना 15 एप्रिल 2021 ला जनकपुरी, दिल्ली येथील पिच्चाडीली हॉटेल मध्ये प्रसिद्ध सिने अभिनेत्री तनुश्री दत्ता यांच्या हस्ते "स्पॉन्सर्ड" ग्लॅम पेज 3 प्रोफेशनल मेकअप गोल्डन विंग्स अवार्ड सिजन 3, बेस्ट मेकअप आर्टिस्ट पुरस्कार देण्यात आला. 

प्रतिभा वाघमारे यांनी चंद्रपूर ला आल्यावर सांगितले कि सदर आयोजना मध्ये देशाच्या विविध भागातून वेगवेगळ्या केटेगरी मध्ये स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमात मॉडेल्सनी डिझायनर ड्रेसेस, मेकअप ज्वेलरी, रॅम्प वॉक इत्यादीचे आयोजका समोर सादरीकरण केले. ह्या कार्यक्रमाचे चे आयोजक  उत्कर्ष निगम, दिवाश चुग, पूनम चुग हे होते. सदर पुरस्कार घेणारी प्रतिभा वाघमारे ही चंद्रपूर मधील फस्ट विनर मेकअप आर्टिस्ट आहे. सदरबाब चंद्रपूरकरां साठी अभिनंदनीय बाब आहे. प्रतिभा वाघमारे यांना अवॉर्ड मिळाल्याची वार्ता कळताच सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन सुरू आहे. प्रतिभा वाघमारे यांनी मिळालेल्या पुरस्काराचे श्रेय स्वतः घेतलेले कठोर परिश्रम, कुटुंबीय व मित्रमंडळींना ला दिले आहे. 








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top