Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गोवरीत कोरोनाचा उद्रेक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आज राजुरा तालुक्यात १०२ बाधितांची नोंद गोवरीत कोरोनाचा उद्रेक ; 66 बाधित सहा वर्षाच्या मुलासह चार तरुणांना संसर्ग गोवरी, रामपूर नंतर सास्ती,...

  • आज राजुरा तालुक्यात १०२ बाधितांची नोंद
  • गोवरीत कोरोनाचा उद्रेक ; 66 बाधित
  • सहा वर्षाच्या मुलासह चार तरुणांना संसर्ग
  • गोवरी, रामपूर नंतर सास्ती, चुनाळा, साखरी, बामणवाडा हॉटस्पॉट
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
मागील दोन आठवड्यापासून गावात तापाची साथ सुरू असल्यामुळे आरोग्य विभागाने सुरू केलेल्या अँटीजन तपासणी शिबिरात दोन दिवसानंतर गोवरी गावात आतापर्यंत एकूण 66 कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून या गावा सोबतच शेजारच्या रामपूर, सास्ती, साखरी, सास्ती टाऊनशिप, चुनाळा व बामणवाडा या गावात मोठ्या प्रमाणात कोविड 19 चे बाधित आढळत असल्यामुळे राजूरा तालुका हादरून गेला आहे. मात्र आरोग्य विभाग सातत्याने कोविड चाचणी करून वैद्यकीय उपचार करीत आहे. दरम्यान लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी ग्रामीण भागात आर्वी, पाचगाव, विहिरगाव, भुरकुंडा व चनाखा या पाच गावातील केंद्रांना मंजुरी मिळाली आहे.

आरोग्य विभागामार्फत गोवरी येथे दोन दिवसापासून अँटीजीन तपासणी सुरू आहे. आतापर्यंत 170 नागरिकांची तपासणी करण्यात आली, त्यात 42 नागरिक कोरोना बाधित आढळले. यापुर्वी 24 रुग्ण ऍक्टिव्ह होते. यामुळे गोवरी गावात 66 रुग्ण ऍक्टिव्ह असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश नगराळे यांनी दिली. यात 18 वर्षाखालील तरुणांचे व एका सहा वर्षीय मुलाचा सुद्धा समावेश असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

काल कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खलाटे यांच्या आदेशान्वये गोवरी गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेले आहे.  

तहसीलदार हरीश गाडे यांनी गोवरी येथे भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली आणि शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले. कोविड बाधितांना उपचारासाठी कोरोना केंद्रावर पाठविण्यात आले आहे.

वैद्यकीय पथक गावातील प्रत्येक कुटुंबांचे सर्वेक्षण करीत आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नगराळे, डॉ. विपिनकुमार ओदेला, आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर या आरोग्य सेवा देत असून प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आणि लक्षणे आढळल्यास तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत सरपंच आशाताई बबन उरकुडे याही स्वतः उपस्थित राहून शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करीत आहेत.

शासनाच्या नियमांचे पालन करा, प्रतिबंधनात्मक लस घ्या
सध्या कोरोना ने बाधितांचे प्रमाण वाढत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तहसील, आरोग्य, ग्राम पंचायत प्रशासन अत्यंत दक्षपणे काम करीत आहे. नागरिकांनी शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच नागरिकांनी प्रतिबंधात्मक लस घ्यावी.
- सरपंच आशाताई बबन उरकुडे 






Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top