शहरात दररोज सहा ते आठ हजारांच्या संख्येने नवे कोरोना बाधित आढळत आहेत. यामुळे कठोर लॉकडाउन लावण्यात आला. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे असाच काहीसा निर्णय पेट्रोलपंप संघटनेने घेतला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर पेट्रोलपंपवर काम करणारे कर्मचारी संसर्गाच्या भीतीने कामावर येण्यास तयार नाहीत. त्यातच सध्या लॉकडाउन सुरू असल्याने व कर्मचाऱ्यांची काळजी म्हणून सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत पंप सुरू ठेवण्याचा निर्णय असोसिएशनचे घेतला असल्याचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आपातकालीन वाहतूक सेवांवर याचा कुठलाही परिणाम होऊ नये यासाठी तेल कंपन्यांतर्फे संचालित पंप सुरू राहतील.
शहरात जवळपास ८५ पेट्रोलपंप असून तेल कंपन्या आणि पोलिस प्रशासनातर्फे चालविण्यात येणारे १० पेट्रोल पंप आहेत. पेट्रोलपंप संघटनेच्या या निर्णयामुळे याचा परिणाम रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास होऊ शकतो. विशेष म्हणजे लॉकडाउनला सुरुवात झाल्यानंतर पेट्रोल व डिझेलच्या विक्रीमध्ये ६५ टक्यांची घट झाली असल्याचेही गुप्ता यांनी यावेळी सांगितले. लॉकडाउनमुळे खासगी कार्यालये, महाविद्यालये, शाळा बंद आहेत. तर सरकारी कार्यालयांमध्येही केवळ १५ टक्के उपस्थितीचा नियम असल्याने एकूणच पेट्रोल व डिझेलचा वापर कमी झाल्याचे पुढे आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.