Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विदर्भवादी १ मे महाराष्ट्र दिनी घरावर लावणार काळे झेंडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
घरावर काळे झेंडे लावून राज्य सरकारचा निषेध करण्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे आवाहन आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी नागपूर - कोरोनाचे भीषण सं...

  • घरावर काळे झेंडे लावून राज्य सरकारचा निषेध करण्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे आवाहन

आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
नागपूर -
कोरोनाचे भीषण संकट आणि लॉकडाउनमुळे येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनी विदर्भवादी कार्यकर्त्यांनी घरावर काळे झेंडे लावून राज्य सरकारचा निषेध करावा, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले आहे.

समितीने दरवर्षी प्रमाणे यंदाही महाराष्ट्र दिन काळा दिवस पाळण्याचे जाहीर केले. वैदर्भीयांच्या भावना राज्यकर्त्यांपर्यंत पोहचण्यासाठी घरावर झेंडा तसेच दंडावर काळी पट्टी बांधून समाजमाध्यमातून छायाचित्र व्हायरल करण्यात येणार आहे. समितीच्यावतीने सातत्याने आंदोलन चालले आहे. वर्षभरापासून करोनामुळे सर्व ठप्प झाले असले तरी, वेगळ्या राज्यासाठी कधी ऑनलाइन तर, कधी ऑफलाइन आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कोरोनाचा उद्रेक लक्षात घेता संकट आणखी वाढण्याचा धोका आहे. गंभीर स्थितीचे भान ठेवून कार्यकर्त्यांनी लॉकडाउनच्या सूचना व नियमांचे पालन करावे. रस्त्यावर न येता घरातच बसून सरकारपर्यंत मागणी पोहोचवावी, असे समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी म्हटले आहे.

महामारीच्या भयंकर संकटात विदर्भ असतानाही ठाकरे सरकारचे पूर्ण लक्ष मुंबई, पुणे आणि नाशिकपर्यंतच आहे. वैदर्भीयांना वाऱ्यावर सोडले आहे. नियोजनशून्य कारभारामुळे रुग्णालयात बेड्स नाही, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सअभावी असंख्य रुग्णांचे प्राण गेले. रेमडेसिव्हिर पुरवठ्यात भेदभाव केला जात आहे. या भागातील प्रश्न सोडवणे तर, दूर रुग्णांना योग्य उपचार मिळाले, याकडेही लक्ष नाही. भयंकर स्थितीत देखील सत्तारुढ व विरोधी पक्षाचे राजकारण चालले असल्याने वेगळ्या राज्यासाठी नागरिकांनी सज्ज व्हावे, असे आवाहनही राम नेवले यांनी केले आहे. 







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top