Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मदर डेअरीकडून दुध उत्पादकांची लुट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी भद्रावती - भद्रावती तालुक्यातील पिपरी (दे.) येथील मदर डेअरी कडून दुध उत्पादक कडून शेतकऱ्यांची लुट होत असून ती...


आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी
भद्रावती -
भद्रावती तालुक्यातील पिपरी (दे.) येथील मदर डेअरी कडून दुध उत्पादक कडून शेतकऱ्यांची लुट होत असून ती त्वरीत थांबविण्यात यावी अशी मागणी दुध उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

पिपरी येथील मदर डेअरीच्या दुध संकलन केंद्रावर मागील चार वर्षापासून फॅट मशीन नादुरुस्त आहे. दुध मोजण्याचा काटासुद्धा नाही. ही मशीनरी नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला स्वमर्जीने भाव दिला जातो. याबाबत गावातील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी डेअरीच्या चंद्रपूर येथील कार्यालयात जाऊन आपली कैफीयत मांडली असता तेथील अधिकारी ने अमरावती येथील अधिकाऱ्यांशी बोलणे केले. यावेळी उडवा-उडवीची उत्तरे देण्यात आली. तसेच संकलन केंद्र बंद करण्याची धमकी देण्यात आली. प्रशासनाने या बाबीची दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पिपरी येथील शेतकरी गंगाधर बोबडे, शिरीष जेनेकर, सचिन कुटेमाटे, सुधाकर पाटील, योगेश मत्ते, विनायक कुटेमाटे, सुभाष भोयर, संदीप काकडे यांनी केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top