Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सावली तालुक्यात रोजगार हमीचे कामे सुरु
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कुमारी पोर्णिमा फाले - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी सावली - सावली तालुक्यातील मौजा उसेगाव येथे रोजगार हमी योजनेची सुरुवात करण्यात आली. ‌पांद...


कुमारी पोर्णिमा फाले - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
सावली -
सावली तालुक्यातील मौजा उसेगाव येथे रोजगार हमी योजनेची सुरुवात करण्यात आली. ‌पांदन रस्ता 500 मिटर निलकंठ भोयर ते गाव नाल्या पर्यंत चे काम सुरु करण्यात आले. यासाठी 480000 निधी मंजुर करण्यात आले आहे. याप्रसंगी सरपंच चक्रधर दुधे, उपसरपंच सुनिल पाल, सदस्य बंडु आभारी, सदस्य दीपिका किनेकार, सदस्य श्रीमती गोहणे, सदस्य सुगंधा मेश्राम,  सदस्य प्रतिभा शेरकर, चतु भोयर व गावकरी उपस्थित होते.

शासनाच्या विविध योजना या गावाचा विकास करण्यासाठी असतात, त्यानुसार संबंधित ग्रामपंचायतीला निधी दिला जातो तसेच लोकांना गावातच रोजगार हमी योजनेतुन काम मिळत असते, "प्रत्येक कामाला हात, हाताला काम" या रोजगार हमी योजनेच्या ब्रिदवाक्यातुन लोकांना मजुरी मिळणार आहे.

धानपिक हंगामानंतर अनेक मजुर हे मिरची तोडण्यासाठी परराज्यात, दुसऱ्या जिल्ह्यात जातात परंतु, मागील वर्षीपासुन कोरोना विषाणु संसर्गामुळे अनेकांना जाऊन परत यावे लागले, या वर्षी लोक जाण्यास टाळाटाळ करीत होते तसेच पुन्हा लाकडाउन होण्याचे संकेत शासन स्तरावरुन दिले जात आहेत, याचा विचार केल्यास रोजगार हमी योजनेची कामे सुरु झाल्याने लोकांना गावातच काम मिळेल व मजुरीपण मिळेल, त्यामुळे तालुक्यात सर्वत्र हि कामे सुरु करण्यात यावी, अशी मागणी आता तालुक्यात जोर धरू लागली आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top