Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: २५ लाखाच्या लाॅटरीचे आमिष दाखवून १० हजाराने लुबाडले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी भद्रावती - तुम्हाला २५ लाखाची लाॅटरी लागली असून पहिले १० हजार रुपये आमच्या खात्यावर जमा करा असा संदेश पाठवून ...

आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी
भद्रावती -
तुम्हाला २५ लाखाची लाॅटरी लागली असून पहिले १० हजार रुपये आमच्या खात्यावर जमा करा असा संदेश पाठवून येथील एका युवकास लुबाडल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
येथील बंगाली कॅम्प निवासी युवक रमजान रशिद शेख याला एका अज्ञात इसमाने व्हिडिओ पाठवला. त्या व्हिडिओमध्ये तुम्हास केबीसी व्हाॅटस् अप क्रमांकावर २५ लाखाची लाॅटरी लागली आहे. त्यासाठी तुम्ही आमच्या क्रमांकावर फोन करुन आम्ही सांगतो त्या खाता क्रमांकावर १० हजार रुपये जमा करा. १० हजार जमा होताच २० मिनिटांनी तुमच्या खात्यावर ही रक्कम ट्रान्सफर होईल व त्याची पावती पाठवली जाईल. त्यामुळे तुमचे रजिस्ट्रेशन होईल व शासनाकडून तुमचा धनादेश पास होईल असेही त्या व्हिडिओद्वारे सांगण्यात आले.तसेच सदर व्हिडिओमध्ये एक धनादेश आणि फाईल दाखविण्यात आली आहे.त्या धनादेशावर बॅंकेच्या अधिकाऱ्याचा शिक्का आणि स्वाक्षरी दाखविण्यात आली आहे. विशेष म्हणजे तुमचा विश्वास बसावा याकरीता धनादेश आणि फाईल तुम्हाला पाठवित असल्याचे सदर व्हिडिओमध्ये म्हटले असून ज्यांना या लाॅटरीचा लाभ मिळाला आहे, त्यांचेसुद्धा व्हिडिओ पाठवित असल्याचे म्हटले आहे. तसेच असे तीन व्हिडिओसुद्धा रमजानच्या व्हाॅटस् अप वर पाठविण्यात आले. ते व्हिडिओ पाहून रमजानचा विश्वास बसला व त्याने १० हजार रुपये त्या भामट्याने सांगितलेल्या खात्यात जमा करुन टाकले. २० मिनिटे झाले तरी ना त्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले ना पावती मिळाली. त्यामुळे रमजानने लगेच त्या भामट्याला फोन केला. मात्र तिकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक  झाल्याचे लक्षात येताच त्याने भद्रावती पोलिस ठाणे गाठले. परंतू तेथे त्याला आम्ही काही करु शकत नाही असे उत्तर मिळाले. त्यामुळे अशी घटना कोणाच्याही सोबत घडू नये असे त्याने आमचा विदर्भच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top