Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महात्मा जोतिबा फुले यांचे विचार प्रेरणा देणारे - विशाल करंडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली अर्पण कुमारी पोर्णिमा फाले - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी सावली - स्त्री शिक्षणा करिता प्रथम शिक्षणाची ...

  • महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली अर्पण
कुमारी पोर्णिमा फाले - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
सावली -
स्त्री शिक्षणा करिता प्रथम शिक्षणाची मुहूर्तमेढ करणारे तसेच छत्रपतींच्या इतिहासाची जगाला माहिती देणाऱ्या सत्यशोधक समाज चळवळीचे जनक महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त आज सायखेडा येथील बौद्ध विहाराजवळ महात्मा जोतीराव फुले यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साध्या पद्धतीने कमी उपस्थिती मध्ये आदरांजली वाहण्यात आली. 
महात्मा जोतिबा फुले यांचे विचार समजाला प्रेरणा देणारे आहे असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चा चंद्रपुर चे जिल्हा उपाध्यक्ष विशाल करंडे यांनी केले. यावेळी भाजपा युवा मोर्चा चंद्रपुर चे जिल्हा उपाध्यक्ष विशाल करंडे, आंबेडकर चळवळीचे विचारवंत भागेश टेंभुर्णे, ग्रा.पं.सदस्य सुलोचना वाघरे, प्रियंका साखरे, मारोती मोहुर्ले, पुरणदास टेम्भूर्णे, कुंदन भैसारे, देवानंद साखरे, राष्ट्रपाल टेंभुर्णे, प्रज्ञावंत टेंभुर्णे, जयंत चौधरी, स्वप्निल वाघरे, केतन वाघरे, प्रविण वाघरे, शुभम टेंभुर्णे, प्रामुख्याने उपस्थित होते. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top