Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अवैध रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
१० आरोपींना अटक ; ७३ लाख ७२ हजाराचा मुददेमाल जप्त तीन वेगवेगळ्या पथकाची धडक शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - मा. पोलीस महासंचालक...

  • १० आरोपींना अटक ; ७३ लाख ७२ हजाराचा मुददेमाल जप्त
  • तीन वेगवेगळ्या पथकाची धडक
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
मा. पोलीस महासंचालक मुंबई, मा. अपर पोलीस महासंचालक मुंबई तसेच  पोलीस महानिरीक्षक नागपुर परीक्षेत्र नागपुर, यांचे अवैध रेती तस्करांवर जिल्हयात धडक कार्यवाही करण्याबाबत पोलीस अधिक्षक अरवींद साळवे यांना आदेश प्राप्त झाले होते. त्यानुसार पोलीस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्या साहाय्याने तिन वेगवेगळे पथक तयार केले.

सदर पथकाने गोपनीय माहिती आधारे जिल्हयातील रामनगर, चंद्रपुर शहर, सिंदेवाही, भद्रावती, राजुरा या पोलीस हददीतील माहीती संकलीत करून पो.स्टे. रामनगर येथे ३ गुन्हे, पो.स्टे. चंद्रपुर शहर येथे २ गुन्हे, पो.स्टे. सिंदेवाही येथे २ गुन्हे, पो.स्टे. भद्रावती येथे २ गुन्हे, पो.स्टे. राजुरा येथे एक गुन्हा असे एकुण १० गुन्हे नोंद करून अवैध रेती चोरी करणाऱ्या रेतीतस्करांवर कार्यवाही करून १० आरोपींना अटक करण्यात आली. या कार्रवाहीत एकुण ७३ लाख ७२ हजार ५०० रू.चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

चंद्रपुर जिल्हयात रेती माफीयांवर आळा घालण्याकरीता त्यांचे विरूदध धडक कार्यवाहीचे सत्र स्थानिक गुन्हे शाखे कडुन सुरू करण्यात आले असुन अवैध रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी अधिक गोपनीय माहिती घेऊन कार्यवाही करणे सुरू आहे. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top