Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांना जिल्हा परिषद अंतर्गत विविध कृषी योजना मंजूर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या मागणीनुसार कृषी सभापती सुनील ऊरकुडे यांचा पुढाकार मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर -...

  • भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या मागणीनुसार कृषी सभापती सुनील ऊरकुडे यांचा पुढाकार

मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाअंतर्गत येणाऱ्या अनेक योजनांबाबत मागणी अर्ज केले होते परंतु सदर अर्ज गेल्या अनेक दिवसांपासून मंजूर झालेले नव्हते त्यासाठी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील ऊरकुडे यांची भेट घेऊन सदर योजना लवकरात लवकर मंजूर करण्यात याव्यात अशी मागणी केली होती.

कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या अनेक योजनांसाठी अर्ज सादर केले होते त्यात काटेरी तार, स्प्रेपंप, ताडपत्री, कॅरेट इत्यादी योजनांसाठी अर्ज सादर केले होते. यातील सर्व उपकरणे शेती उपयोगी येणार आहेत तसेच, या योजना मंजूर झाल्या नसल्यामुळे शेतकरी सदर लाभाच्या प्रतीक्षेत होते, त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील ऊरकूडे यांनी कोरपना तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर केलेले आहे, तरी कोरपना तालुक्यातील लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.व जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील ऊरकुडे यांचे आभार व्यक्त केले आहे.

कोरपना तालुक्यातील लाभार्थ्यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागात संपर्क साधून मंजूर झालेल्या योजनांना लाभ घ्यावा असे आवाहन भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी केले आहे. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top