- तहसीलदारां समवेत गट विकास अधिकारी यांनीही दिली पाथरी ला भेट
पाथरी परिसरातील कोरोना बाधितांची वाढती संख्या बघता व कोरोनामुळे पाथरी येथे 3 व्यक्तीचा मृत्यू झाला असता त्यात एक 24 वर्षाच्या तरुण होता. त्या अनुषंगाने पाथरी तथा परिसरातील परिस्थिती बिकट होऊ नये यासाठी तहसीलदारांनी पाथरी ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच तथा पदाधिकारी तथा सायखेडा उसरपार चक येथील पदाधिकारी तसेच आरोग्य वर्धिनी केंद्र पाथरी येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन कोरोनाच्या संदर्भात मागर्दर्शनपर सूचना केल्या. जनतेमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन करत त्यांनी कोरोना चाचणी तथा लसीकरण वाढविण्याच्या अनुषंगाने लोकांना जागृत करून प्रोत्साहित करण्यास सांगितले. तहसीलदारांनी पाथरी नगरीत स्वतः फिरून गावाची पाहणी केली. मेडिकल व्यावसायिकांना योग्य मार्गदर्शन करून सूचना करण्यात आल्या. कोरोनाची परिस्थिती सध्या बिकट असून नागरिकांना सर्दी ताप खोकला असल्यास घरीच न राहता पाथरी येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात जाऊन स्वतःची कोरोना चाचणी करून घेण्यात यावी व स्वतःची काळजी घ्यावी तथा विनाकारण बाहेर फिरू नये अत्यावश्यक काम असल्यास तोंडाला मास्क लावून बाहेर पडावे स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले. कोरोनाच्या काळात पाथरी ग्राम पंचायत जनतेची काळजी घेत असून नागरिकांनी कोरोनाचे लक्षण आढळल्यास स्वतःहून पुढे येऊन कोरोना चाचणी करण्याच्या सूचना वारंवार करीत आहे. गावामध्ये फवारणी केल्या जात आहे. कोरोनाच्या बाबतीत कुठल्याही अफवांना बळी न पडण्याचे आवाहन पाथरी ग्रामपंचायत ने केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.