Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गोंडराजे महाराजे खांडक्या बल्लाळशाह आत्राम यांचा अस्तित्व मिटवण्याचा ढोंगी बाबाचा प्रकार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्थानिक प्रशासन व पुरातन विभागाच्या निष्काळजीपणा बल्लारशाह नगरपालिकेतील झोपलेल्या प्रशासनाला जाग येणार तरी कधी - सारंग कुमरे अध्यक्ष गों.वि....

  • स्थानिक प्रशासन व पुरातन विभागाच्या निष्काळजीपणा
  • बल्लारशाह नगरपालिकेतील झोपलेल्या प्रशासनाला जाग येणार तरी कधी - सारंग कुमरे अध्यक्ष गों.वि.स चांदागड

शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
चंद्रपुर जिल्ह्याचा इतिहास पाहता पूर्वी चांदागड (चंद्रपुर) हे गोंडवानाची राजधानी राहिली आहे बल्लारशाह हे शहर धार्मिक ऐतिहासिक गोंडराजा ची नगरी म्हणून प्रख्यात आहे. येथे गोंडराजांची अधिसत्ता राहिली गोंडराजांनी या शहरावर आपली हुकूमत चालविली या शहराची निर्मिति गोंड महाराजे खांडक्या बल्लाळशहा आत्राम यांनी इ.स 1247 मधे केली म्हणूनच राजे खांडक्या बल्लाळशहा आत्राम यांच्या नावा वरुण या शहराच नाव बल्लारशाह ठेवण्यात आले आहे. 

याच शहरात महाराजे खांडक्या बल्लाळशहा यांची समाधी आहे येथे. काही दिवसा पासुन राजे खांडक्या बल्लाळशहा यांच्या समाधी स्थळावर चंद्रमा प्रकाश मिश्रा नावाचा ढोंगी बाबा आपली दुकानदारी करत आहे देवी-देवतांची फोटो लावून लोकांकडून चंदा जमा करने पूजा अर्चना करून सर्रास खांडक्या बल्लाळशहा महाराजांचा अस्थित्व-इतिहास मिटविण्याच काम तो करत असल्याचा आरोप गोंडवाना विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लावला आहे. 

गोंडराजांच्या समाधी कडे तेथील प्रशासनाच दुर्लक्ष का..? बल्लारशाह नगरपालिका प्रशासन व पुरातत्व विभाग झोपण्याच ढोंग करून समाधी कडे दुर्लक्ष तर करत नाहीत ना? असे अनेक प्रश्न गोंडसमाजा समोर येत आहेत. गोंड समाज हा शांतीच्या मार्गाने चालणारा समाज आहे. या समाजाला डिवचण्याचे कार्य प्रशासनाने करू नये त्याकरिता येत्या 10 दिवसाच्या आत तेथील प्रस्थापित प्रशासनाने आणि पुरातन विभागाने खांडक्या बल्लाळशहा महाराजांच्या समाधी स्थळाकडे लक्ष देऊन ढोंगी बाबाची दुकानदारी हटवावी आणी त्याला तात्काळ अटक करावी नाही तर गोंडवाना विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरून जनाक्रोश चक्का जाम आंदोलन छेडनार आणि आपल्या स्टाईलने  ढोंगी बाबाची धडा शिकविणार असल्याची मागणी गों.वि.स चांदागड चे अध्यक्ष सारंग कुमरे यांनी केली. अयोग्य प्रकार घडल्यास याची पूर्ण जवाबदारी ही प्रशासनाची राहील असा इशारा गोंडवाना विद्यार्थी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सारंग कुमरे, सचिव पलाश पेंदाम, गणपत नैताम, गणेश आत्राम यांनी दिली. 







Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top