Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नागरिकांना व्हक्सीनेशन साठी प्रोत्साहित करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करा खासदार अशोक नेते यांचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी घेतला चिमूर तालुक्यातील कोविड स्थिती चा...

  • कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करा
  • खासदार अशोक नेते यांचे निर्देश
  • खासदार अशोक नेते यांनी घेतला चिमूर तालुक्यातील कोविड स्थिती चा आढावा
कुमारी पौर्णिमा फाले - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
सावली -
चिमूर तालुक्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व नागरिकांमध्ये वैक्सिन घेण्यासाठी जनजागृती करण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी दिले. शासकीय विश्रामगृह, चिमूर येथे आयोजित कोविड स्थिती संदर्भातील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

आढावा बैठकीला प्रामुख्याने भाजपचे प्रदेश सदस्य डॉ श्यामजी हटवादे, युवा नेते मनोज हजारे, चिमूर चे उपविभागीय अधिकारी सपकाळ, तहसीलदार नागतीलक, चिमूर चे ठाणेदार शिंदे, भिसी चे ठाणेदार गभणे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, बीडीओ, तालुका आरोग्य अधिकारी, व अन्य अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते.

आढावा बैठकीत खासदार अशोक नेते यांनी माहिती घेतली असता, सध्यस्थीतीत चिमूर तालुक्यात 860 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाल्याचे निर्दशनास आले. चिमूर तालुका मोठा असून येथील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे त्यामुळे येथे 500 अतिरिक्त बेडची व्यवस्था करण्यात यावी व यासाठी वसतिगृह व शासकीय इमारती ताब्यात घेण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले. तसेच कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून खाजगी डॉक्टराची मदत घ्या, ऑक्सिजन सिलेंडर फक्त 33 असल्याने ते वाढविण्यात यावे, 1 रुग्णवाहिका व 1 स्वर्गरथ उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा, चिमूर येथे डीसीएच सेंटर सुरू करण्यात यावे, असे निर्देश यावेळी खासदार अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांना दिले. 






Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top