- BREKING NEWS
- व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले - शहरातील ५ दुकान सील
- दुकानांवर कडक कार्यवाही
- आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे पुढील आदेशा पर्यंत दुकाने राहतील बंद
राजुरा -
कोरोना विषाणूचा वाढता पादुर्भाव बघता शासन आदेशानुसार १ मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले. स्थानिक तहसील प्रशासनानेसुद्धा एक आठवड्या करिता दवाखाने, औषधी आस्थापना वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. नंतर त्यात सुधारणा करत जीवनावश्यक वस्तू आस्थापना सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरु ठेवण्याचे आदेश दिले होते. असे असतांना देखील आज सकाळी ११.३० ते १२.३० चे दरम्यान तहसील कार्यालय, नगर परिषद व पोलिसांच्या संयुक्त पथकाने गस्ती दरम्यान निर्देशित केलेल्या वेळेनंतर हि दुकाने सुरु ठेवणाऱ्या सोमनाथपूर वॉर्डातील शंकर किराणा एन्ड जनरल, नाका नं. ३ येथील सुनील इलेक्ट्रिकल्स, नाका नं ३ येथील वासवी किराणा स्टोअर्स, नेहरू चौकातील शबाब स्टील एन्ड सिमेंट, आंबेडकर चौकातील जे.के मोबाईल ला शासनाचे संदर्भीय आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे सदर आस्थापनां पुढील आदेशापर्यंत सील करून बंद करण्याचे आदेश देण्यात आले. सदर आस्थापना संचालका विरोधात फौजदारी कार्यवाही करण्यात येईल असेही तहसीलदार राजुरा तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कडून कळविण्यात आले आहे. सदरची कार्यवाही राजुरा चे कर्तव्यदक्ष तहसीलदार हरीश गाडे सर यांच्या आदेशाने महसूल विभागा चे पटवारी राहुल श्रीरामवार, सुभाष साळवे, माहुरे, नगर परिषदेचे अक्षय सूर्यवंशी, उपेंद्र धामणगे, विरेंद्र धोटे, हरीश पाटील, पोलीस विभागाच्या PSI वर्षा तांदुळकर महसूल, पोलीस विभाग व नगर परिषदेच्या संयुक्त चमूने केली. या धडक कार्यवाहीने व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले असून कडक कार्यवाहीची आता व्यापाऱ्यांनाही हुळकी बसली आहे.
मा. अधिकारी , कर्मचारी आपला जीव धोक्यात टाकुन ब्रेक दि चैन मिशनसाठी रात्रं दिवस पहारा देत आहे परंतु राजुरातील किशोरवयीन मुले घोळक्याने फिरतांना दिसत आहे. मा, महोदय कृपया आपण त्यांच्यावर आळा घालावा हि विनंती.
उत्तर द्याहटवा