- शांत, सुस्वभावी, सुसंस्कृत नेता हरपला – आ. सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर -
वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व महाराष्ट्र राज्याचे माजी सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांचे आज नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. मृत्युसमयी ते 58 वर्षाचे होते. मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसापासून ते आजारी होते त्यांना नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आज त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात सांस्कृतिक मंत्री अशी अनेक पदे त्यांनी भूषविली आहेत. अत्यंत मृदू स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून संजय देवतळे यांची ओळख होती. त्यांच्या मृत्युने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
शांत, सुस्वभावी, सुसंस्कृत नेता हरपला – आ. सुधीर मुनगंटीवार
राज्याचे माजी मंत्री संजय देवतळे यांच्या निधनाने शांत, सुस्वभावी, सुसंस्कृत नेता हरपल्याची शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
संजय देवतळे यांच्या निधनाची बातमी धक्कादायक असुन या बातमीवर विश्वासच बसत नाही. विधानसभा सदस्य म्हणुन त्यांनी दीर्घकाळ जनतेची सेवा केली आहे. अतिशय शांतपणे, संयमितपणे जनतेचे प्रश्न विधानसभाग़हात मांडणारा अभ्यासु लोकप्रतिनिधी म्हणुन त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. पर्यावरण व सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणुन त्यांनी उत्तम कामगिरी बजावली. त्यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्हयाच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना या दु’खातुन सावरण्याचे बळ देवो असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.