Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: खासदार अशोक नेते यांनी घेतला बोथली (हिरापूर) आरोग्य केंद्रात कोविशिल्ड वैक्सिन चा दुसरा डोज
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नागरिकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी गावातील आरोग्य केंद्रात घेतली वैक्सिन वैक्सिन मी पण घेतली, आपणही घ्या चा दिला संदेश कुमारी पौर्णिमा फाले ...

  • नागरिकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी गावातील आरोग्य केंद्रात घेतली वैक्सिन
  • वैक्सिन मी पण घेतली, आपणही घ्या चा दिला संदेश
कुमारी पौर्णिमा फाले - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
सावली -
आजही अनेक नागरिक कोरोना लसीकरण करण्यासाठी घाबरत आहेत त्यांच्यामध्ये समज-गैरसमज निर्माण झालेले आहेत ते दूर करून लसीकरणसाठी नागरिकांना परावृत्त करण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी सावली तालुक्यातील बोथली ( हिरापूर ) गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी कोविशिल्ड ही लस घेतली. व नागरिकांना लसीकरण करण्याचे आवाहन केले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राजकुमार गेहलोत, सावली चे भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश पाल, तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व परिचारिका उपस्थित होते. यावेळी खासदार अशोक नेते यांनी सांगितले की मी 9 मार्च 2021 रोजी दिल्ली येथील संसद भवनात कोविशिल्ड लसीचा पहिला डोज घेतला असून आज दुसरा डोज तुमच्या गावात घेत आहे. या लसीपासून तुम्हाला कोणताही धोका नसून ही लस पूर्णपणे सुरक्षित असून तुमचे कोरोना या आजारापासून बचाव करणारी आहे. या लसीमुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढत असून  तुम्हाला कोरोना व्हायरस पासून दूर ठेवते त्यामुळे निःसंकोचपणे ही लस घेण्याचे आवाहन यावेळी खासदार अशोक नेते यांनी केले. तसेच लसीकरण केंद्रावरील माहिती जाणून घेऊन सर्व नागरिकांना लस देण्याचे सूचना आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना केल्या. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top