Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आर्वी येथील आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाला सुरुवात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरोना प्रतिबंधक लसीकरणास उर्स्फूत प्रतिसाद अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - प्राथमिक आरोग्य केंद्र कढोली अंतर्गत आर्वी ...

  • कोरोना प्रतिबंधक लसीकरणास उर्स्फूत प्रतिसाद
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
प्राथमिक आरोग्य केंद्र कढोली अंतर्गत आर्वी येथील आरोग्य उपकेंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात करण्यात आली. या उपकेंद्रा अंतर्गत आर्वी, माथरा, गोयेगांव, कापनगांव, अंतरगांव व मुठरा येथील नागरिकांनी लसीकरण देण्यात येणार आहे. परिसरातील गावातील लोकांचा लसीकरणाला उर्स्फूत प्रतिसाद मिळत असून लसी अभावी लोकांना परत हि जावे लागत आहे. आज झालेल्या लसीकरणात ४५ नागरिकांना लस देण्यात आली. लसीकरणासाठी सरपंच शालूताई लांडे, आरोग्य सहायक एस.एस. चिडे, आरोग्य सेविका कु. एस.एम. आमडे, सीएचओ एम.एन. वजीर, आरोग्य सेवक बी.जी. गोटमुखले, आर.एस. धानोरकर, के.ए. विभुते यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top