Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जम्बो रुग्णालय व अद्यावत रुग्ण्वाहिका उपलब्ध करण्याची सचिन डोहे यांची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सीमेंट उद्योग व वेकोली च्या सामाजिक दायित्व निधीतून मदत करण्याचे आवाहन अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - संपूर्ण जगाला को...

  • सीमेंट उद्योग व वेकोली च्या सामाजिक दायित्व निधीतून मदत करण्याचे आवाहन
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
संपूर्ण जगाला कोविड -१९ या महामारीने ग्रासले आहे. सर्वत्र ऑक्सिजन व रेमेडिसिवीर इंजेक्शन सह ऑक्सिजन बेड ची कमतरता मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. चंद्रपुर जिल्ह्यात कोविड -१९ ची वाढती रुग्णसंख्या बघता जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. राजुरा उपविभागिय क्षेत्रात अनेक गावे कोरोना हॉटस्पॉट झालेले आहे. या सर्वांचा ताण आरोग्य यंत्रणेवर आला आहे. परिणामी आरोग्य सेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे सीमेंट उद्योग व वेकोली च्या सामाजिक दायित्व निधीतुन (सी.एस.आर.) मधून राजुरा येथे जम्बो रुग्णालयाची निर्मिती व अद्यावत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्च्याचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. 

राजुरा उपविभागामधे मोठ्या प्रमाणात सीमेंट उद्योग व कोळसा खाणी आहेत. या कंपन्यांचा सामाजिक दायित्व निधी हा मोठ्या प्रमाणात असून याचा उपयोग कोविड काळात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत रुग्णसेवे करीता करण्यात यावा अशी मागणी डोहे यांनी केली आहे. सध्या राजुरा उपविभागांमधे बेड ची संख्या कमी असून कोविड रुग्नांना महाराष्ट्र सोडून तेलंगना राज्यात उपचारांसाठी जावे लागत आहे. त्यातच महाराष्ट्र-तेलंगाना प्रवासात आणि दरम्यान उपचार व्यवस्थित न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागले आहे. त्यामुळे या कम्पनी चे सी.एस.आर निधीचा वापर त्वरित करून राजुरा येथे जम्बो कोविड केंद्र निर्माण करावे आवश्यक वैद्यकीय मनुष्यबळ तसेच अद्यावत सोयीयुक्त रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात यावे अशी मागणी चे निवेदन डोहे यांनी जिल्हाधिकारी चंद्रपुर सह माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहिर, माजी अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा अध्यक्ष लोकलेखा समिती महाराष्ट्र राज्य आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी आमदार अँड.संजय धोटे व उपविभागीय अधिकारी राजुरा यांना दिले आहे. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top