यवतमाळ -
कोरोना प्रादुर्भाव मोठ्या संख्येत पसरला आहे. त्यामुळे ठिकाणचे रुग्णालय कोविड ग्रस्त रुग्णांनी भरगच्च भरले आहे. अशा वेळी त्यांच्या सोबत येणाऱ्या कुटुंबीयांची व वाहन चालकाची हेळसांड होते. हि बाब लक्षात घेऊन माजी मंत्री संजय देशमुख यांनी त्यांच्या सहकार्यासाठी निशुल्क भोजन व्यवस्था आणि निशुल्क निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. मागील काही दिवसांपासून येथील कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शिवाय अनेक रूग्ण बाहेरून येथे उपचारा करीता येत आहे. अश्या वेळी त्यांच्या सोबत येणाऱ्या सहकाऱ्यांचा किंवा मदती करिता येणाऱ्या कुटुंब व मित्रांची हेळसांड होते. आधिच सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद असल्याने रुग्णासोबत येणाऱ्या सहकाऱ्यांला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांची जेवनाची व्यवस्था होत नाही. त्यांच्या निवासाची व्यवस्था होत नाही. म्हणून कुठे तरी आडोसा घेऊन त्यांना दिवस व रात्र काढावी लागते. हि बाब माजी मंत्री संजय देशमुख यांना हेरली. आणि त्यांनी नवीन बसस्थानका जवळ असलेली आणि आरोग्य धाम रुग्णालयाच्या कोविड केअर सेंटरपासुन अंत्यंत जवळ असलेले ईश्वर देशमुख फार्मसी काॅलेज च्या ईमारती मध्ये सुसज्जीत अशी व्यवस्था केली आहे. या ठिकाणी त्यांना निशुल्क निवास व भोजन व्यवस्था केली जाईल. त्याच प्रमाणे आवश्यकता पडल्यास रुग्णांकरीता ही निशुल्क भोजन पोहोचु असे मत माजी मंत्री संजय देशमुख यांनी व्यक्त सांगितले. त्यांच्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.