- आम आदमी पार्टीची पोलिस अधीक्षक यांचेकडे मागणी
कु. आशा घटे हिला आपल्या कार्यालयात बोलावून अपमानास्पद भाषेचा वापर करून तिला वाईट वागणूक दिली. या अपमानास्पद वागणुकीचा आशाच्या मनावर गंभीर परिणाम झाल्यानेच तीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे, असा आरोप मृत आशाच्या वडीलांनी केलेला आहे. या तक्रारीची नोंद करण्यासाठी आशाचे वडील पोलिस स्टेशन, राजुरा येथे गेले असता त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. वास्तविक तक्रारीची दखल घेऊन एफ.आय.आर. दाखल करणे अपेक्षित होते. असे न झाल्याने पोलिसांच्या संशयास्पद वागणुकीवर मात्र आता संशय घेतला जातो आहे.
या घटनेचे गांभीर्य ओळखून आम आदमी पार्टी, शाखा राजुरा या घटनेचा तिव्र निषेध व्यक्त करते आहे. या घटनेची नि:पक्षपाती व सविस्तरपणे चौकशी व्हावी, यासाठी जवाबदार अधिकारी जी. पुलय्या यांचे निलंबन करून त्यांचेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे आम आदमी पार्टी, शाखा राजुरा तर्फे करण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.