Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सिटीस्कॅन तपासणीकरिता शासन दर निश्चित - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांना सीटी स्कॅनसारख्या तपासण्या क...


शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांना सीटी स्कॅनसारख्या तपासण्या करण्याची आवश्यकता भासत आहे. या तपासणीसाठी खाजगी रूग्णालये किंवा सीटी स्कॅन तपासणी सुविधा उपलब्ध असलेली तपासणी केंद्राकडून एचआरसीटी-चेस्ट चाचणीकरिता शासनाने निश्चित करून दिलेल्या सर्व करासहीतच्या खालील दराप्रमाणे किंवा यापुर्वी त्यापेक्षा कमी दर असल्यास त्याप्रमाणे दर आकारणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहेत.  

एचआरसीटी चेस्ट तपासणीकरिता मशीनच्या क्षमतेनुसार निश्चित केलेले दर कंसात दर्शविल्याप्रमाणे आहेत. 16 स्लाईसपेक्षा कमीसाठी दोन हजार रुपये, मल्टी डिटेक्टर सिटी 16-64 स्लाईस करिता रूपये दोन हजार पाचशे, मल्टी डिटेक्टर सिटी 64 स्लाईसपेक्षा जास्त करिता रूपये तीन हजार दरनिश्चित करण्यात आले आहेत. उपरोक्त कमाल रकमेत सी.टी.स्कॅन तपासणी अहवाल, सीटी फिल्म, पी.पी.ई. किट, डिसइन्फेक्टंट सॅनिटायझोशन चार्जेस व जी.एस.टी. या सर्वांचा समावेश असेल.

एचआरसीटी चेस्ट तपासणी केल्यानंतर अहवालावर उपरोक्तपैकी कोणत्या सी.टी. मशिन्सद्वारे तपासणी केली आहे ते नमूद करणे बंधनकारक असेल. या तपासणीमध्ये किरणोत्सर्जन द्वारे तपासणी असल्याने जोखीम असते यासाठी नोंदणीकृत डॉक्टरांच्या  प्रिस्क्रिप्शन शिवाय ही तपासणी करू नये.आयआरसीटी-चेस्ट तपासणी करणाऱ्या रेडिओलॉजिस्टने संपूर्ण तपासणी अहवाल देणे आवश्यक राहील. ज्या रूग्णांकडे आरोग्य विमा योजना आहे किंवा एखाद्या रूग्णालयाने किंवा कार्पोरेट/खाजगी आस्थापनेने जर एचआरसीटी तपासणी केद्राशी सांमजस्य करार केलेला असेल त्यासाठी उपरोक्त दर लागू राहणार नाहीत.

सर्व रूग्णालये, तपासणी केंद्रे यांनी एचआरसीटी- चेस्ट तपासणीसाठी निश्चित केलेले दर (मशिनच्या प्रकारानूसार) दर्शनी भागात लावणे तसेच, निश्चित दरानूसार दर आकारणी करण्याबाबत हॉस्पिटल व्यवस्थापनाला सूचना देणे बंधनकारक राहील.

तपासणीसाठी निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारणी केल्यास संबंधितावर कारवाई करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी व महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका आयुक्त हे कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यास सक्षम प्राधिकारी राहतील असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे. 



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top