Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गुन्हेगाराने साथीदाराच्या मदतीने ठार मारण्याची धमकी देत डॉक्टरला केली खंडणीची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आयशा - आमचा विदर्भ कार्यालय प्रतिनिधी नागपूर - गुन्हेगाराने साथीदाराच्या मदतीने ठार मारण्याची धमकी देऊन डॉक्टरला खंडणीची मागणी केली. ही घटना...


आयशा - आमचा विदर्भ कार्यालय प्रतिनिधी
नागपूर -
गुन्हेगाराने साथीदाराच्या मदतीने ठार मारण्याची धमकी देऊन डॉक्टरला खंडणीची मागणी केली. ही घटना नवीन कामठीतील आशा हॉस्पिटलमध्ये घडली. डॉ. राजेंद्र रामबाबू अग्रवाल वय ६५ यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पोलिसांनी दोघांविरुद्ध धमकी व खंडणीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शरद देवराव गोमेकर वय ३८, रा. कल्पतरू कॉलनी याला अटक केली. त्याचा साथीदार मुकेश चौधरी हा फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये शरद गोमेकर याने कन्हान येथे मिठ्ठू या गुन्हेगारावर हल्ला केला. जखमी मिठ्ठूला आशा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर शरद व त्याच्या साथीदारांनी हॉस्पिटलमध्ये घुसून मिठ्ठूची हत्या केली. याप्रकरणात कन्हान पोलिसांनी शरद व त्याच्या साथीदारांना अटक केली. काही दिवसांपूर्वी शरद हा कारागृहातून जामिनावर सुटला. बुधवारी त्याने डॉ. अग्रवाल यांच्या मोबाइलवर संपर्क साधून ठार मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्याची धमकीही त्यांनी दिली. डॉ. अग्रवाल यांनी लगेच पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार, कारवाई करण्यात आली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top