Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: इंदिरा नगर येथे महिला काँग्रेसची कार्यकारिणी गठीत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अध्यक्षपदी जयश्री मडावी तर उपाध्यक्षपदी सुप्रिया उराडे व नाहीजा कुरेशी अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - राजुरा शहरातील इ...

  • अध्यक्षपदी जयश्री मडावी तर उपाध्यक्षपदी सुप्रिया उराडे व नाहीजा कुरेशी
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा शहरातील इंदिरा नगर वार्ड येथे महिला काँग्रेसची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यात अध्यक्षपदी जयश्री मडावी तर उपाध्यक्षपदी सुप्रिया उराडे आणि नाहीजा कुरेषी यांची निवड करण्यात आली. सचिव म्हणून माधुरी येवले, मेघा गंपावार सहसचिव म्हणून रेखा तोकालवार तर सदस्य म्हणून वनमाला मेश्राम, शोभा वानखेडे, फस्जाना शेख, लीला गोडसेेलवार, रंजना कोडापे, स्वाती आकुलवार, सविता मेश्राम, छाया रागीट, वैषाली खडसे, रेखा देठे, कीरण त्रिशूलवार, सुलताना शेख, मीराबाई मेश्राम, जयश्री मडावी, मंजुशा बुरडकर, ज्योती चंदेलवार, सुशमा जुनघरे यांची निवड करण्यात आली.

या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अरूण धोटे, नगरसेविका तथा महिला शहराध्यक्ष संध्या चांदेकर, नगरसेविका गीता रोहने आदी मान्यवर उपस्थित होते. तर कार्यक्रमात इंदिरा नगर वार्ड येथील अनेक महिला उपस्थित होते. 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top