Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: लालपरीची वाट पाहत, प्रवासी होत आहे लाल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
प्रवासी बघतोय वाट, मात्र बसचा थांगपत्ताच नाही कुमारी पोर्णीमा फाले - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी सावली - चंद्रपूर वरून सावली हरांबा गडचिरोल...

  • प्रवासी बघतोय वाट, मात्र बसचा थांगपत्ताच नाही
कुमारी पोर्णीमा फाले - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
सावली -
चंद्रपूर वरून सावली हरांबा गडचिरोली जाणारी बस मागील काही आठवड्यांपासून येत नसल्याने प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे. चंद्रपूर वरून सकाळी ७.०० वाजता सुटणारी बस २ मार्चपासून बंद झाल्यामुळे आज येणार - उद्याला येणार म्हणून प्रवासी वाट बघत आहेत.

व्याहाड बुज येथे बँकेच्या कामाकरीता जायचे झाल्यास त्यांना दुपारच्या बसची वाट बघावी लागते.तसेच अनेक लोक गडचिरोली येथे कामाकरीता जात असतात बस नसल्याने त्यांना लिफ्ट मागून आपला प्रवास करावा लागतो. सध्या लग्न सीजन चालू असल्यामुळे लग्नाची खरेदी करण्यासाठी अनेक लोक गडचिरोली येथे जात असतात.

सावली पासून गडचिरोली जवळ असल्याने अनेकजण सकाळी येऊन आपले काम पूर्ण करून सायंकाळपर्यंत जात असतात. पण सकाळची बस नसल्याने त्यांना लिफ्ट किंवा दुसरा मार्ग शोधत प्रवास करावा लागतो.त्यामुळे हरांबा उपरी गडचिरोली बस लवकर चालू करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top