Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वाघाच्या हल्यात इसम ठार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मोहफूल वेचणे जीवावर बेतले कुमारी पोर्णीमा फाले - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी सिंदेवाही - सिंदेवाही तालुक्याच्या शिवणी जंगलात मोहफूल गोळा कर...

  • मोहफूल वेचणे जीवावर बेतले

कुमारी पोर्णीमा फाले - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही -
सिंदेवाही तालुक्याच्या शिवणी जंगलात मोहफूल गोळा करण्यास गेलेल्या एका इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली.  मृतकाचे नांव श्रीधर आत्राम वय ५५ असून श्रीधर सिरखाडा येथील असल्याची माहिती सामोरे आली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहचून शवचा पंचनामा केला. याघटनेमुळे ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. 




Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top