Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: तात्काळ रस्त्याचे काम पूर्ण करून वाहतुक सुरळीत करण्याची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - पोवनी ते हडस्ती या दहा किमीच्या रस्त्याची नुकत्याच झालेल्या रुंदीकरण व मजबुती करनाचे का...


अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -

पोवनी ते हडस्ती या दहा किमीच्या रस्त्याची नुकत्याच झालेल्या रुंदीकरण व मजबुती करनाचे काम ठप्प असल्या मूळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता दिवसेंदिवस एका बाजूला अधिकच खचला जात असून खड्यांचे प्रमाण हि वाढत आहे. यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले असून या रस्त्यावर अनेक वाहनधारकांना आपला जीवही धोक्यात घालावा लागला आहे. स्तरावर खड्यांचे साम्राज्य होऊन रस्ता उखडला जात असून रस्त्याची पूर्णत: चाळण झालेली असल्याने पोवनी ते हडस्ती हा दहा किमीचा रस्त्या वर टाक्यन्यात आलेली गिट्टी आता पूर्णपणे बाहेर आल्या मुळे वाहनधारकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते. त्यात वाह्नाचे नुकसान तर होते परंतु या कसरतीत रस्तावर किरकोळ व लहान मोठे अपघात नित्याचे घडत एकेरी अपघातही घडू लागले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी पोवनी, कढोली बूज, बाबापूर, चार्ली, नीर्ली, हडस्ती या रस्त्यावरील गावातील ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे. बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कित्येक वाहनधारकांना आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे.

मागे काही दिवसा अगोदर काढोली वासियांनी बांधकाम विभाकडे तक्रारवजा निवेदन देखील दिले होते. परंतु अजूनपावतो सांबा विभागाकडून कुठलीही हाल चाल दिसून नाही येत असल्याच्या आरोप गावकऱ्यांनी लावला आहे. 




Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top