Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरोना लसीकरणासाठी भाजपा करेल प्रशासनाला सहकार्य
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महानगर भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याची मागणी शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - जिल्ह्यात व महा...

  • महानगर भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
  • लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याची मागणी

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
जिल्ह्यात व महानगरात कोरोना लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी भारतीय जनता पार्टी सहकार्य करेल.जिल्हा प्रशासनाने अवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्या अशी मागणी महानगर भारतीय जनता पार्टी तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली असून जिल्हा प्रशासनाला याबाबत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन महानगर भाजपाच्या शिष्ठमंडळाने दिले.

महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात शिष्ठमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेतली ज्यात महानगर भाजपा महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार, उपाध्यक्ष अरुण तिखे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष (श) विशाल निंबाळकर, भाजयुमो उपाध्यक्ष यश बांगडे यांचा समावेश होता.

यावेळी चर्चा करतांना डॉ मंगेश गुलवाडे म्हणाले, १एप्रिल पासून देशातील ४५ वर्षावरील सर्वांना कोरोना लस देण्याचा नवीन टप्पा सुरू झाला आहे. या अनुषंगाने केंद्र शासनाने राज्यशासनाला मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. ज्या भागात कोरोनाचा  धोका जास्त आहे, त्या भागाची ओळख करून तिथे लसीकरणाचा कार्यक्रम गतीने राबविण्याच्या सूचना आहेत.

आपल्याही महानगरात व जिल्ह्यात रोज रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लसीकरणाची मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रभावी नियोजन करावे. बधितांचा शोध घेऊन त्यांचे गृह किंवा संस्थात्मक विलगिकरण कसे केले जाईल या दिशेनेही नियोजन करणे गरजेचे आहे.या ईश्वरीय-जनसेवेच्या कार्यात भारतीय जनता पार्टी सदैव जिल्हा प्रशासनांसोबत राहील.असे आश्वासन त्यांनी दिले.

चंद्रपुरात कोरोना आटोक्यात रहावा म्हणून सर्व उपाययोजना कराव्या.त्याच प्रमाणे भाजपा कडून अपेक्षित सहकार्य लेखी कळवावे अशी विनंती त्यांनी केली. 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top