Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: माजी आमदार अँड संजय धोटे यांची आदिवासी अतिदुर्गम भागातील गावांना भेटी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार कार्यकाळात पूर्ण व सुरू असलेल्या कामाची केली पाहणी अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भ...

  • आमदार कार्यकाळात पूर्ण व सुरू असलेल्या कामाची केली पाहणी
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात माजी आमदार अँड संजय धोटे यांनी गावागावात जाऊन भेटी देऊन आदिवासी बांधवांशी संवाद साधला, थीप्पा, मंगलहिरा, उमरहीरा या गावांना भेटी देऊन आदिवासी बांधवाच्या समस्या जाणून घेतल्या, थीप्पा येतील पुरातन हनुमान मंदिर येथे भेट देऊन अर्धवट असलेल्या बांधकामाची पाहणी करून माहिती घेतली, यावेळी ग्रामस्थांनी माजी आमदार अँड धोटे यांचे जंगी स्वागत करून त्यांना मंदिरापर्यंत वाजत गाजत स्वागत केले,

अर्थवट असलेल्या मंदिराचे बांधकाम करण्यासाठी यावेळी सहकार्य करण्याची यावेळी त्यांनी सांगितले, तसेच आपल्या आमदारकीच्या कार्यकाळ या भागात विकासकामाला भरघोस निधी उपलब्ध करून दिला होता, अश्या कामांना भेट देऊन थीप्पा ते तेलंगणासीमा, दुर्गाडी फाटाते शिवापूर, उमरहिरा ते रुपापेठ रोडची पाहणी केली, तसेच मांगलहिरा पाणीपुरवठा विहिरीला भेट दिली. यासंदर्भात गावकरी नागरिकांची समस्या जाणून घेतली. 

उमारहिरा येथील भारतीय जनता पक्षाचे भीमराव गेडाम यांचे वडील अल्पशा आजाराने निधन झाले त्याच्या घरी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी भाजपाचे अनिल कवरासे, ज्योती राम कोहाचाडे, भारत सोयाम, मलकू तुमराम, लक्ष्मण मडावी व गावातील ईतर समाज बांधव व आदिवासीं बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top