Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: खाद्यतेल भडकतेय
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
उन्हाळ्यात खाद्यतेलाचा भडका उडाला सोयाबीन आणि सनफ्लॉवर तेलामध्ये लक्षणीय दरवाढ आयेशा - आमचा विदर्भ कार्यालय प्रतिनिधी नागपूर - दिवाळीनंतर पु...

  • उन्हाळ्यात खाद्यतेलाचा भडका उडाला
  • सोयाबीन आणि सनफ्लॉवर तेलामध्ये लक्षणीय दरवाढ
आयेशा - आमचा विदर्भ कार्यालय प्रतिनिधी
नागपूर -
दिवाळीनंतर पुन्हा एकदा ऐन उन्हाळ्यात खाद्यतेलाचा भडका उडाला आहे. विशेषत: सोयाबीन आणि सनफ्लॉवर तेलामध्ये लक्षणीय दरवाढ झाली आहे. सनफ्लॉवरच्या पंधरा लिटरच्या डब्यामागे जवळपास आठशे तर सोयाबीनच्या पंधरा किलोच्या डब्यामागे ६५० रुपयांची वाढ दिसून येत आहे.

अंबुजा गोल्ड या सोयाबीन तेलाचा पंधरा किलोंचा डबा दिवाळीमध्ये १७७० रुपयांना मिळत होता. आता त्याचा दर २२०० रुपयांवर पोहचला आहे. व्हिलिना सोयाचा दर १७७७ रुपयांवरून २२०० रुपयांवर पोहोचला आहे. हीच स्थिती सनफ्लॉवरमधील सर्वाधिक मागणी असलेल्या फॉर्च्युन तेलाची आहे. फॉर्च्युन सनफ्लॉवरचा पंधरा लिटरचा डबा १७०० रुपयांवरून २६५० रुपयांवर गेला आहे. पाच महिन्यांच्या आत झालेली ही दरवाढ सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी ठरत आहे. मुख्य म्हणजे ऐन लग्नसराईच्या मौसमात दर वाढल्यामुळे ग्राहकांचे बजेट बिघडत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अधिक सांगताना खाद्यतेलाचे ठोक विक्रेता नंदू येनुरकर म्हणाले,'दिवाळीनंतर सातत्याने दरवाढ सुरू आहे. मागील पाच महिन्यांचा विचार केल्यास ही दरवाढ सामान्या ग्राहकांची चिंता वाढविणारी आहे. ही दरवाढ वायदे बाजारामुळे होत आहे. वायदे बाजारावर नियंत्रण आल्यास दरवाढ थांबून योग्य किंमतीत ग्राहकांना खाद्यतेल मिळू शकणार आहे.' खाद्यतेलाच्या दरवाढीला करोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार लागू करण्यात आलेले निर्बंधदेखील कारणीभूत ठरले आहेत. कडक निर्बंधांमुळे इतवारीतल खाद्यतेलाची ठोक दुकाने बंद राहणार असल्याने गर्दी होते. परिणामत: त्याचा लाभ घेत दरवाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. सध्याचा शहरातील मृत्यूदर पाहता पुन्हा एकदा टाळेबंदी झाल्यास ही दरवाढ अधिक दिसून येईल, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

असे बदलले दर
तेलाचा ब्रॅण्ड-नोव्हेंबर २०२०-डिसेंबर २०२०-जानेवारी-फेब्रुवारी-मार्च
अंबुजा गोल्ड-१७७७-१७७०-१८२०-१८६०-२२००
व्हिलिना सोया-१७७७-१७५०-१८१०-१८५५-२२००
पाम-१६५७-१६६०-१६८०-१६९०-२०७०
अंबुजा पाउच-१०७-१०७-११०-११२-१३४ 



Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top