Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: उपचारा विनाच कोरोना बाधिताचा प्रवाशी निवाऱ्यात तडफडून मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पालकमंत्री वड्डेट्टीवारांच्या मतदारसंघातील दुर्दैवी घटना दवाखान्यात न ऑक्सिजन न बेड उपलब्ध आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स ब्रह्मपुरी - ब्रह्...

  • पालकमंत्री वड्डेट्टीवारांच्या मतदारसंघातील दुर्दैवी घटना
  • दवाखान्यात न ऑक्सिजन न बेड उपलब्ध

आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
ब्रह्मपुरी -
ब्रह्मपुरी शहरातील ख्रिस्तानंद चौक येथील प्रवासी निवारा मध्ये एका इसमाचा उपचाराअभावी दुर्देवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज घडली. शहरातील दवाखान्यालगत असलेल्या प्रवाशी निवाऱ्यात ५० वर्षीय कोरोना बाधित इसमाचा उपचाराअभावी तडफडून दुर्दैवी मृत्यू झाला. गोविंदा बळीराम निकेश्वर ५० असे मृतकाचे नांव असून तो नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील आंबोरा येथील निवासी होता. 

मृतक हा कोरोना बाधित असल्याने आणि प्रकुर्ती बिघडत असल्याने त्याला चिकित्सकांनी शनिवारी ब्रम्हपुरी रेफर केले. कोरोना बधिताला घेऊन त्याची पत्नी खाजगी वाहनाने ब्रह्मपुरीला आली होती. मात्र ख्रिस्तानंद दवाखान्यात बेड उपलब्ध नसल्याने त्याला दाखल करण्यात आले नाही. दवाखान्यात न ऑक्सिजन, न बेड उपलब्ध नसल्याने त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले नाही. हताश झालेल्या मृतकाच्या पत्नीने ख्रिस्तानंद चौकातील प्रवाशी निवाऱ्यात पतीला घेऊन रात्रभर होती. मात्र आज सकाळी ८ वाजताच्या दरम्यान त्या इसमाचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू झाला. प्रशासनाला माहिती मिळताच प्रशासनातील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले लगेच सर्व यंत्रणेला पाचारण करून मृत बाधित इसमावर अंत्यविधी करण्यात आला. 

ब्रम्हपुरी तालुका हा मदत व पुनर्वसन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांच्या मतदार संघ आहे. या भागात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतांना मात्र स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. अश्यातच पालकमंत्र्यांनीही क्षेत्राकडे पाठ फिरविली असल्याचा आरोप कोरोना बाधित कुटुंबियातील सदस्यांनी केला आहे. मागील एकाच आठवड्यात ५२९ कोरोना बाधित निघाल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे. अश्यातच उपचाराअभावी प्रवाशी निवाऱ्यात कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याने स्थानिक आणि जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य सुविधेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

  1. एक वर्ष उलटून जर ह्या राजकारण्यांना काही करता येत नसेल तर सोडुन द्या राजकारण अरे असल्या सत्ताधारी पक्षापेक्षा एक आमदार असलेला पक्ष तुमच्या पेक्षा लाखपटीने चांगल काम करतोय थोडा तरी बोध घ्या आमदार राजु पाटील कल्याण ग्रामीण पुण्यात वसंत तात्या मोरे थोड शिका त्यांच्या कडून ते सुध्दा नसेल जमत तर सोडुन द्या हा धंदा 🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top