Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: लग्न समारंभासाठी आता 25 लोकांनाच उपस्थितीत राहण्यास परवानगी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - चंद्रपुर जिल्हा कार्यक्षेत्रात जमावबंदी व टाळेबंदीबाबत नियमावली आणि उपाययोजना दि. 14 एप्रिल, ...


मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपुर जिल्हा कार्यक्षेत्रात जमावबंदी व टाळेबंदीबाबत नियमावली आणि उपाययोजना दि. 14 एप्रिल, 2021 चे रात्री 08.00 ते दि 01 में, 2021 चे सकाळी 07.00 वाजेपर्यंतच्या कालावधीकरीता लागु केलेल्या आहेत. सध्या चंद्रपूर जिल्हयात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे, विशेषतः ग्रामीण भागात लग्न/विवाह समारंभामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्याचे प्रमाण दिसुन येत आहे, ज्यामुळे कोरोना साथरोग ग्रामीण भागात सुध्दा मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी एका आदेशान्वये लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त 25 लोकांना उपस्थितीत राहण्यास परवानगी दिली आहे.

आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित वर-वधु, त्यांचे आई-वडील, मंगल कार्यालय/लॉन/सभागृह मालक, कॅटरर्स यांचेवर नियमाप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात येईल तसेच संबंधित गावाचे तलाठी व ग्रामसेवक यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top